नांदेड(प्रतिनिधी)-सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांना दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार सकाळी 5 वाजेच्यासुमारास घडलेला आहे. दरोडेाखोरांनी अनिकेत कुलकर्णी यांचा 45 हजार रुपयांचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. त्यांच्यासोबत आणखी एका वयक्तीला धाक दाखविण्यात आला होता. परंतू त्यांच्याकडून कांही लुटले गेले नाही.
आज दि.8 जानेवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत पाटील नावाचे एक व्यक्ती डी मार्टच्या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 5 वाजता गेले असतांना डी मार्टकडून दुचाकीवर आलेल्या तीन दरोडेखोरांनी त्यांनी दाखव दाखवून त्यांच्याकडून 45 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. पाटील यांच्याकडे कांही मौल्यवान वस्तु नव्हती म्हणून त्यांच्याकडून कांही लुटले गेले नाही.
भाग्यनगर पोलीसांनी या संदर्भाने जबरी चोरीचा गुन्हा तीन जणांविरुध्द दाखल केला आहे. त्यावेळी दुचाकीचा नंबर पाहता आलेला नाही. तरी पण भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी सांगितले की, जवळपासच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आम्ही नक्कीच या दरोडेखोरांना पकडू. पत्रकार अनिकेत कुलकर्णी काका यांच्यावर झालेल्या या दरोड्याच्या प्रकरणामुळे सर्वच पत्रकार व्यथीत आहेत. भाग्यनगरसह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस सुध्दा या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांना दरोडेखोरांनी लुटले