नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांसोबत हुज्जत घालून स्वेटरच्या दोरीने स्वत: गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांविरुध्द मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात एक आरोपी फौजी जवान आहे.
दि.6 जानेवारी रोजी भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत गणपतराव किनगे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार हे भाग्यनगर पेालीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 284/2021 कलम 384, 386, 506 भारतीय दंड संहिता आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 नुसार दाखल झालेल्या या गुन्हयातील आरोपी शोधण्यासाठी कृष्णानगर मुदखेड येथे गेले. तेथे त्यांनी दत्ता गोविंद बिढकलवार हा एसएसबी बटालीयन 42 मधील फौजी आणि त्याचे वडील गोविंद गंगाधर बिढकलवार या दोघांना सांगितले की, तुमच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. तेंव्हा तुम्हाला पोलीस निरिक्षक भाग्यनगर यांच्याकडे घेवून जाण्यासाठी आलो आहोत. यावेळी फौजी असलेल्या दत्ता बिढकलवार (31) याने आपल्या स्वेटरच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यावर कोणताच गुन्हा नाही असे सांगत झटापट केली.
सुशांत किनगे यांच्या तक्रारीवरुन मुदखेड पेालीसांनी फौजी आणि त्याच्या वडीलांविरुध्द गुन्हा क्रमांक 4/2022 कलम 353, 323, 309 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला असून तपास मुदखेडचे पोलीस अंमलदार गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीसांसोबत हुज्जत घालणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल ; एक फौजी जवान