कॉंग्रेस नगरसेवकाने पत्र दिल्यावर सुध्दा बेघर पत्रकारांच्या बोगस कामावर कार्यवाही झाली नाही

नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यामध्ये कॉंग्रेस नगरसेवकाने सप्टंेंबर 2021 मध्ये दिलेल्या पत्रावर अद्याप काही कार्यवाही झाली नाही. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रावर मनपा आयुक्तांनी बेघर पत्रकारांच्या त्या सोसायटीला नोटीस काढली आहे. पण ती नोटीस बेघर पत्रकारांचे पालनहार घेत नाहीत अशी माहिती समोर आली आहे.
नांदेड येथील शोभानगर हाऊसिंग सोसायटीशेजारी असलेल्या सर्व्हे नंबर 1 व 2 असदुल्लाबाद येथील दोन एकर जागा पत्रकार सहवास गृहनिर्माण संस्थेला पत्रकारांच्या गृहनिर्माणासाठी लिजवर दिली आहे. या कोट्यावधी रुपयांच्या भुखंडाचा गैरवापर होत आहे. कांही लोक जे पत्रकार नाहीत त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे भुखंड हडप केले आहेत. ज्यांना पत्रकार म्हणून या भुखंडांमध्ये जागा देण्यात आली त्यांनी अनाधिकृत पध्दतीने भुखंडांची विक्री केलेली आहे. महानगरपालिकेने ज्या नियम व अटींवर भुखंड दिले होते. त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. मनपाच्या भुखंडांची कांही लोक परस्पर विल्हेवाट लावून करोडो रुपये गोळा करीत आहेत. त्यामुळे या भागात होणारी भुखंड विक्री थांबवावी असा अर्ज कॉंग्रेसचे नगरसेवक मुन्तजिबोद्दीन मुनिरोद्दीन यांनी 16 सप्टेंबर 2021 रोजी दिला होता. या अर्जावर प्रत्यक्षात काय कार्यवाही झाली याची माहिती प्राप्त झाली नाही. परंतू खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा आयुक्तांनी या पत्रावर बेघर पत्रकारांच्या पाठीराख्यांना नोटीस काढली आहे. पण ती नोटीस स्विकारण्यास कोणत्याही पत्रकार सदस्याने पुढाकार घेतलेला नाही. लोकांचे उणेदुणे काढण्यात आपले शौर्य दाखवतांना आपण चुकलेल्या आणि हडप केलेल्या भुखंडांबाबत उत्तर द्यायला का कोणी तयार नाही हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

या भुखंडांमध्ये एका भुखंडावर हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे एक टोलेजंग इमारत उभी राहत आहे. पत्रकारांच्या सोसायटीवर ही इमारत माधवराव जवळगावकर यांच्या नावावर बांधली जात आहे की, कोण्या इतराच्या नावावर याची माहिती प्राप्त झाली नाही. परंतू ती इमारत त्यांचीच आहे असे अनेक जण सांगतात. महानगरपालिकेने या इमारतीचा बांधकाम परवाना देतांना का त्याची तपासणी केेली नाही. हाही विषय या निमित्ताने समोर आला आहे. बहुदा कॉंग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे आणि महानगरपालिकेत कॉंगे्रस पक्षाचे बाहुल्य असल्यामुळे बहुदा आ.माधवराव पाटील जवळगावकरांना सहज बांधकाम परवाना मिळाला असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
बेघर पत्रकारांसाठी पत्रकार सहवास सोसायटी तयार करून त्यामध्ये अशा अनेक जणंाची नावे आहेत. जे पुर्वीपासूनच गडगंज श्रीमंत आहेत. विशेष म्हणजे या सोसायटीमध्ये कांही महिलांना सुध्दा पत्रकार दाखवून त्यांना भुखंड देण्यात आले आहेत. मागील तीस वर्षाचा ईतिहास पाहिला तर या पत्रकार सोसायटीमध्ये असलेल्या नावांमधील अनेक व्यक्ती आणि एकही महिला पत्रकार या संज्ञेत मोडते हे दाखवतांना त्या पत्रकार समितीच्या सदस्यांना का लाज वाटली नसेल. हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. कांही नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकार दिनाच्या दिवशी बदलेल्या पत्रकारीता परिस्थितीत काय-काय आवश्यक आहे हे सांगत असतांना आम्ही नेहमीच सहकार्य करू असे सांगितले. यावरूनच त्याही काळात ज्या काळात ही सोसायटी तयार झाली आणि भुखंड विक्री झाले त्याही काळात नेत्यांनी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपले उणे-दुणे कोणी काढू नये म्हणूनच या बेघर पत्रकारांना दोन एकरचा भुखंड प्रदान केल्याचे दिसते.