सोनु कल्याणकरवर हल्ला करणारे सात जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-अनिकेत उर्फ सोनु कल्याणकरवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या 7 जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडून आणल्यानंतर आज दि.8 जानेवारी रोजी भाग्यनगर पोलीसांनी त्यांना न्यायालयात हजर करून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुदस्सर नदीम यांनी या हल्लेखोरांना 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास श्रीनगर भागात अनिकेत उर्फ सोनु अशोक कल्याणकर यावर कांही जणांनी अग्नीशस्त्रातून हल्ला केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 268/2021 दाखल झाला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी या प्रकरणात कोण-कोण काय-काय भुमिका वठवली त्यानुसार बलप्रितसिंघ उर्फ आशीष नानकसिंघ सपुरे (24), प्रितेश बाबूराव परघणे(26), अफजल खान मुसा खान पठाण(33) एस.टी.महामंडळ मेकॅनीक, रोहित मारोतराव इंगळे(21), शुभम सिताराम चव्हाण (29) लिपीक एस.टी महामंडळ, सुमित अशोक एमले (20), दिनेश उर्फ निप्स मनोहर जमदाडे (25) रा.श्रीनगर नांदेड अशा सात जणांना पकडले. दाखल झालेला गुन्हा भाग्यनगर पोलीस ठाण्याचा होता. म्हणून सर्व आरोपी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
आज दि.8 जानेवारी रोजी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गणेश कदम आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार कळके, संतोष वच्छेवार, गर्दनमारे, मारोती मुसळे यांनी या सात आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयात या प्रकरणातले गांभीर्य मांडून गणेश कदम यांनी पोलीस कोठडीची मागणी केली.युक्तीवाद ऐकून न्या.मुदस्सर नदीम यांनी सर्व सात हल्लेखोरांना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *