अबब …. नवीन कोरोना रुग्ण दीड शतकाच्या पुढे;उपचार घेणारे रुग्ण पाच शतकापार;नांदेड शहरात एकूण रुग्णांच्या तुलनेत ८४.१४ रुग्ण सापडलेत 

नांदेड,(प्रतिनिधी)- आज सोमवारी कोरोना विषाणूने दुसऱ्या कहर करीत एकूण १६४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५४४ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९६.४९ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात १०.८६ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ८४.१४ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १० जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज १६४ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-२७,नांदेड तालुक्यातील-०१,सरकारी रुग्णालय विष्णुपुर -०१, अश्या २९ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७९४६ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६.४९ टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-१३८, मुखेड-०२, कंधार-०१, नांदेड ग्रामीण-०३, किनवट-०२, धर्माबाद-०१, हिंगोली-०२, मुखेड -०३, बिलोली-०१,माहूर-०१,भोकर-०२,देगलूर-०१,हदगाव-०१, परभणी-०५, उमरी-०१,वाशीम-०१,यवतमाळ-०२, असे आहेत.
                          आज १५१० अहवालांमध्ये १२९५ निगेटिव्ह आणि १६५ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९११४५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत १४५ आणि १९ अँटीजेन तपासणीत असे एकूण १६५ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ५१ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
                                आज कोरोनाचे ५४४ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -४२२, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-८८,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२३, खाजगी रुग्णालयात- १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०१ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०४ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *