चारचाकी वाहनाचा  ‘ ट्रायल’ मारतांना चक्कर येवून पडल्याने इसमाचा मृत्यू; प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील घटना

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- चारचाकी वाहनाचे ट्रायल घेतल्यानंतर एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना १० जानेवारी रोजी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात घडली. मृत्यूनंतर रुग्णवाहिका वेळवर न आल्याने मृतदेह सुमारे तासभर जागेवरच पडून होता.
भावसार चौक येथील रहिवाशी विठ्ठल तुळशीराम काळे (६१) हे १० जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात ठरलेल्या तारखेनुसार चारचाकी वाहनाचे ट्रायल मारण्यासाठी गेले होते. ट्रायल मारल्यानंतर त्याना चक्कर आल्याने काही वेळ जागेवरच बसले होते, असे सांगण्यात येत असून  त्यानंतर काही वेळाने पुन्हा चक्कर येवून जागेवरच कोसळले. सदर घटना घडल्यानंतर बघ्याची प्रचंड गर्दी जमली होती. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राऊत, सहाय्यक परिवहन अधिकारी निमसे, मोटारवाहन निरीक्षक टिळेकर, आर.एस.ढोबळे घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *