
नांदेड,(प्रतिनिधी)- भोकर ते नांदेड प्रवास करणाऱ्या चारचाकी गाडीने खरबी शिवारात उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने त्यातील दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.इतर दोन पोलीस गंभीर अवस्थेंत उपचार घेत आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी दिपक देवानंद जाधव ब.न.3374 नेमणूक,पो.मु.नांदेड सलंग्न नियंत्रण कक्ष, ईश्वर सुदाम राठोड ब.न.2727 नेमणूक पो.मु.नांदेड, पो.कर्मचारी प्रितेश ईटगाळकर ब.न..2853,सदानंद सपकाळ ब.नं.234 ने.पो.मु.नांदेड हे त्यांचा मित्र सुनिल सांभाळकर ने.पो.मु.नांदेड रा.भोकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम करुन इंडिका कार नंबर MH-26-V-1868 ने भोकरवरुन नांदेडकडे जात असताना रात्री 9.30 वाजेच्या सुमारास भोकर ते नांदेड रोडवरील खरबी शिवारात रस्त्याने जाणाऱ्या उसाचा ट्रक्टर नंबर MH-26-AR-1156 चे ट्रालीला मागुन धडकले आहे.त्यात ईश्वर सुदाम राठोड व दिपक देवानंद जाधव दोघे हे जागीच मरण पावले आहेत.सदानंद सपकाळ आणि प्रितेश ईटगाळकर दोघे गंभिर जखमी झाले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय सूत्रांनी सांगितले की,जखमी अवस्थेतील दोन पोलिसांची कंबर आणि पायांची हाडे मोडली आहेत.त्यांना 72 तास निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
बारड येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उप निरीक्षक भद्रे आणि पोलीस अंमलदार श्रीनिवास चेनाजेलु,स्वाधीन ढवळे,मारोती मस्के,देवानंद थाडके,बालाजी ठाकूर आणि अनेक नागरिकांनी मेहनत करून जखमींना रुग्णालयात पाठवले.या अपघातात चारचाकी गाडीचा पार चेंदामेंदा झाला आहे.
