नांदेड(प्रतिनिधी)-मटक्याचे पैसे देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी शंकरनगर साखर कारखान्याच्या घरात आत्महत्या केलेल्या माणसाबद्दल तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेलंगणा राज्यात राहणाऱ्या शिवकन्या बालाजी पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 जानेवारीच्या मध्यरात्री 2 वाजता शंकरनगर सहकारी कारखाना रामतिर्थच्या प्रांगणातील घरांमध्ये तेथील कर्मचारी आणि शिवकन्याचे वडील पंढरी लक्ष्मण पांचाळ यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत शिवकन्या पांचाळ आपल्या तक्रारीत म्हणते असद बाबूमियॉं पठाण रा.शंकरनगर कारखाना, शेख ताहेर आणि एकाचे नाव माहित नाही अशा तिघांनी त्यांचे वडील पंढरी लक्ष्मण पांचाळ यांना मटक्याचे पैसे देण्यासाठी त्रास देत होते . या तिघांनी पंढरी पांचाळला एम.एच.26 3487 या क्रमांकाच्या चार चाकी वाहनात बळजबरीने डांबून ठेवले होते आणि या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केली आहे. या तक्रारीवरुन रामतिर्थ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 7/2022 कलम 306, 363, 342, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव करीत आहेत.
मटक्याचे पैसे देण्याच्या कारणावरून एकाची आत्महत्या ; तिघांवर गुन्हा दाखल