नांदेड,(प्रतिनिधी)- बनावट पणा करून एका ५५ वर्षीय माणसाचे ऑन लाईन ४९ हजार रुपये काढून घेणाऱ्या दोन जणांना वजिराबाद पोलिसांनी काही तासातच अटक केल्यांनतर मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांनी त्या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
दिनांक ११ जानेवारी रोजी विलास रामचंद्र सूर्यमुखे (५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून ऑन लाईन फसवणूक आणि बनावट पणा करून ४९ हजार रुपये काढून घेतले आहे.वजिराबाद पोलिसांनी याबाबत गुन्हा क्रमांक ७/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) नुसार दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम अधिक तपास करीत आहेत.
तांत्रिक मदत आणि मेहनत करून वजिराबाद पोलिसांनी काही तासातच बनावट पणा करून ४९ हजार रुपये लाटणाऱ्या ओंकार अरबिंद धुळेकर (२२) आणि बालाजी बापूराव वाघमारे (३४) या दोन ठकसेनानां गजाआड केले.आज १२ जानेवारी रोजी पोल्सी निरीक्षक दत्तात्रय निकम,पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे,अंकुश पवार,संतोष आलूवाड आदींनी दोन ठकसेनांनां न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली.न्या.एस.एस.पाटील यांनी तीन दिवस पोल्सी कोठडी मंजूर केली आहे.