कोरोना नियमावलींना ठेंगा दाखवणाऱ्या कोचिंग क्लासेसवाल्यांकडून ९५ हजारांचा दंड वसूल

नांदेड,(प्रतिनिधी)- कोरोना आपला उद्रेक वाढवत असतांना कोचिंग क्लासेसवाल्यानी आपला धंदा सुरूच ठेवला आहे.आज महानगर पालिकेने चार कोचिंग क्लासेसची तपासणी केली तेव्हा त्यात नवीन कोरोना नियमावलीला ठेंगा दाखवणाऱ्या चार कोचिंग क्लासेसवाल्यांकडून मनपाने ९५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
                        १ जानेवारी नंतर कोरोना उद्रेक वाढतच चालला आहे.सध्या वातावरण सुद्धा ढगाळ आणि थंड आहे.त्यामुळे बहुतांश लोक कोविड रोगाच्या प्रभावात येत आहेत. म्हणूनच कोरोना विषयक नवीन नियमावलीचे प्रसारण प्रशासनाने केले आहे.त्याच नवीन नियमावलीची तपासणी करण्यासाठी आज मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनात,अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे आणि गिरीश कदम यांच्या नेतृत्वात मनपाचे उप आयुक्त अजितपालसिंघ संधू,क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव,डॉ.मिर्जा फरहतुल्लाह बेग,रमेश चवरे,डॉ.रईसोद्दीन अविनाश अटकोरे,सहायक आयुक्त सुधीर इंगोले यांच्या पथकाने आरसीसी कोचिंग क्लासेस,   शांभवी कोचिंग क्लासेस,दरक कोचिंग क्लासेस,सलगरे कोचिंग क्लासेस अश्या चार क्लासेसची तपासणी केली.तेथे कोरोना नियमावलीला ठेंगा दाखवून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु होते.कोरोनाचा धोका जास्त लोक जमलेल्या ठिकाणी मोठा आहे.तरीही आपले उखळ [पांढरे करणाऱ्या या कोचिंग क्लासेसवाल्यानी आपला धंदा सुरूच ठेवला होता.
                तेव्हा मनपाच्या पथकाने आरसीसी कोचिंग क्लासेस (५००००/-रुपये),   शांभवी कोचिंग क्लासेस (२५०००/- रुपये),दरक कोचिंग क्लासेस (१००००/- रुपये) आणि सलगरे कोचिंग क्लासेस  (१००००/- रुपये) असा येऊन ९५०००/- रुपये दंड ठोठावून त्यांच्या कडून हा ९५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
                     महानगर पालिकेने जनतेला आवाहन केले आहे की,सर्वानी कोरोना नियमावलींचे पालन करून आपल्याविरुद्ध होणाऱ्या दंडाच्या कार्यवाहीतून स्वतःला वाचवावे.तसेच स्वतः आणि आपल्या कुटुंबाला कोरोना पासून दूर ठेवावे.मनपाने कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी अनेक पथकांची नियुक्ती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *