पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार करणारा आयटी इंजिनिअर पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीचा अनैसर्गिक पध्दतीने शारिरीक उपभोग घेणाऱ्या आयटी इंजिनिअरला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
11 जानेवारी 2022 रोजी एका 27 वर्षीय विवाहितेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न 21 फेबु्रवारी 2021 रोजी झाले आहे. तिचा नवरा आयटी इंजिनिअर आहे आणि कोरोनामुळे वर्कफॉर्म होम या संकल्पनेत तो घरी राहुनच काम करीत आहे. लग्नानंतर माझ्याकडे असलेल्या फोनवर माझ्या नातलगांचे आलेले फोन त्यांना आवडत नसे म्हणून त्यांनी माझा फोन स्वत:कडे ठेवला. जिवे मारण्याची धमकी देवून माझा इंस्टाग्राम आयडी व पासवर्ड घेवून टाकला. माझ्या लग्नानंतर माझा नवरा आणि सासु हे फक्त 15 दिवस माझ्यासोबत छान वागले.
त्यानंतर 25 जून 2021 रोजी रात्री मला अश्लिल व्हिडीओ क्लिीप दाखवून माझ्सोबत अनैसर्गीक व्यवहार केला. सोबतच त्या अनैसर्गिक व्यवहाराचे व्हिडीओ चित्रीकरण केले. घडलेला प्रकार मी माझ्या सासुला सांगितला तर तेंव्हा त्यांनी तु बायको आहे सहन करावे लागते असे सांगून माझ्यावरच अत्याचार केला. वेळोवेळी होणाऱ्या अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून मी 10 जानेवारी 2022 रोजी माझ्या माहेरी आले आणि तक्रार देत आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 498(अ), 323, 504, 506 आणि 34 नुसार विवाहितेचा नवरा आणि तिच्या सासुविरुध्द गुन्हा दाखल केला. आयटी इंजिनिअर असलेल्या नवऱ्याला सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात यांनी 13 जानेवारी मध्यरात्रीनंतर अटक केले.
आज सुरेश थोरात आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या आयटी इंजिनिअरला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडला. न्यायाधीश एस.ए.खलाने यांनी आयटी इंजिनिअरला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *