नांदेड(प्रतिनिधी)-भ्रष्टाचार बाबत स्वत: Whistleblower असल्याचे आपल्या याचिकेत लिहुन शेख जाकीर शेख सगीरने Whistleblower या शब्दाचा एका अर्थी अपमानच केला आहे. थहळीींश्रश इश्रेुशी कोण असतो, त्याची व्याख्या काय याचा गुगलवर शोधले असता अन्यायाविरुध्द आवाज उठवणारा व्यक्ती Whistleblower असतो. पण स्वत:ला पोलीसांची फुकट सुरक्षा मिळावी यासाठी ओरड करणारा समाजसेवक असू शकतो काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
नांदेड पोलीसांनी आपल्याला दिलेली पोलीस सुरक्षा काढल्यानंतर त्याबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 1535/2021 दाखल करणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरने मी आरटीआय कार्यकर्ता आहे, समाजसेवक आहे आणि समाजाबद्दल आदर ठेवणारा व्यक्ती आहे आणि Whistleblower आहे. असे स्वत:चे वर्णन याचिकेत केले आहे. भ्रष्टाचार या विषयावर शासन स्वत: काम करते त्यामुळे या शब्दाचा वापर इतरांनी करू नये असे एक परिपत्रक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र मुंबई यांनी 4 जुलै 2018 रोजी जारी केलेले आहे. त्याचा क्रमांक 543 असा आहे. मग हा शेख जाकीर शेख सगीर भ्रष्टाचाराचा Whistleblower कसा होता. यावर सुध्दा उच्च न्यायालय विचार करेलच ना ?
पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी शेख जाकीर शेख सगीरच्या चुकीच्या कामासाठी उठवलेल्या आवाजानंतर त्याने विशेष दिवाणी खटला क्रमांक 58/2020 आणि 79/2021 दाखल केले. रिट याचिकेमध्ये हे क्रमांक आरसीएस असे लिहुन त्याला फौजदारी प्रकरणे दाखविण्याचा खोटारडेपणा शेख जाकीरने केलेला आहे. आपल्या रिट याचिकेत मी 23 नोव्हेंबर 2021 रोजी रामप्रसाद खंडेलवाल विरुध्द दिलेल्या अर्जाचा उल्लेख केलेला आहे. त्या अर्जात संदर्भ लिहिलेला अर्ज शेख जाकीर शेख सगीरचा पिट्टू पवन बोराने वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेला आहे. त्याची तारीख 3 नोव्हेंबर 2021 आहे. म्हणजे संदर्भ एका व्यक्तीचा आणि 23 नोव्हेंबरला दिलेला अर्ज स्वत:च्या नावाचा असा पुन्हा बनावट पणा रिट याचिकेत केलेला आहे. खरे तर शेख जाकीर शेख सगीरविरुध्द नांदेडच्या एका व्यक्तीने दिलेल्या अर्जाची बातमी लिहिल्यानंतर त्याने हे सर्व खेळ सुरू केले होते. त्यानंतर दिवाणी दावे दाखल केले, व्हॉटसऍप संकेतस्थळावर रामप्रसाद खंडेलवाल व त्यांच्या कुटूंबियांचे चारित्र्य हनन केले त्यानंतर रामप्रसाद खंडेलवाल यांनी दिलेली तक्रार ही खोटी आहे असा सर्वोच्च न्यायालयासारखा निकाल देत रिट याचिका दाखल केली.
शेख जाकीर शेख सगीरने आपल्या रिट याचिकेत पोलीस महासंचालकांसोबत व्हॉटसऍपवर झालेले चॅट सार्वजनिक केले आहेत. त्यानुसार या शेख जाकीरने नांदेडमधील 12 लोकांची नावे पोलीस महासंचालकांना दिली होती आणि त्यांची सुरक्षा काढण्यासाठी सांगितले होते. पण घडले मात्र वेगळेच या नावांसह सुरक्षा निघणाऱ्या नावांमध्ये शेख जाकीर शेख सगीरच्या नावाचा सुध्दा समावेश झाला. म्हणूनच म्हणतात ना इतरांसाठी खड्डा खोदला तर त्या खड्यात आपण सुध्दा पडू शकतो आणि माझ्या सांगण्यामुळे त्या 12 पैकी कांही जणांची सुरक्षा काढल्याचे लिहिले आहे. म्हणजे शेख जाकीर शेख सगीर हा पोलीस महासंचालकांना काम संागता आणि पोलीस महासंचालक त्याचे ऐकून कामे करतात असाच याचा अर्थ होतो.
शेख जाकीर शेख सगीरची सुरक्षा काढल्याची नोंद पोलीस ठाणे स्टेशन डायरीमध्ये आहे आणि त्याची प्रत याला प्राप्त झाली आहे. हे रिट याचिकेत लिहिले आहे. कोण आहे तो सुर्याजी पिसाळ, कोण आहे तो मिरजाफर किंवा मिर सादीक हा पोलीस दलातलाच आहे ज्याने या सर्व नोंदी त्याला उपलब्ध करून दिल्या. रिट याचिकेमध्ये पोलीस निरिक्षक अर्धापूर यांनी दिलेले तीन अहवाल आणि अपर पोलीस अधिक्षक भोकर यांनी दिलेले चार अहवाल नमुद आहेत. हे गुप्त अहवाल शेख जाकीर शेख सगीरला कसे प्राप्त झाले याचा शोध पोलीस महासंचालकांनीच घ्यावा अशी ही परिस्थिती आहे. एक व्यक्ती पोलीसांना अशा प्रकारे वेठीस धरतो हे घटनाक्रमावरुन सिध्द होते. रामप्रसाद खंडेलवालने माझ्याविरुध्द वजिराबाद पोलीसांना मॅनेज करून गुन्हा दाखल करायला लावला असे रिट याचिकेत लिहिले आहे. मग पोलीस निरिक्षक अर्धापूरने पाठवलेले तीन अहवाल आणि अपर पोलीस अधिक्षक भोकरने पाठवलेले चार अहवाल कोणी मॅनेज केले हा प्रश्न सुध्दा उच्च न्यायालयाने शेख जाकीर शेख सगीरला विचारला पाहिजे. एवढेच नव्हे तर माझ्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यात वजिराबाद पोलीस 169 चा अहवाल पाठवून मला दोषमुक्त करतील अशी अपेक्षा सुध्दा या रिटयाचिकेत लिहिलेली आहे. म्हणजे हा पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हे काय?
याबाबत पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी सांगितले की, आमचा जन्मच अंधारात झाला आहे. त्यामुळे सावल्यांना भिण्याचा कांही प्रश्न उदभवत नाही. सध्या आपले डोळे आणि कान उघडे ठेवून जगत आहोत, समाजाला सावधान करत आहोत चैनीने राहणाऱ्या लोकांना तुम्ही आपल्या घाणेरड्या शब्दांनी त्रास देवू नका त्यासाठी आमची तयारी सुध्दा खुप लांबपर्यंतची केलेली आहे.
Whistleblower हा शब्द वापरून त्याचा अपमान करणाऱ्या शेख जाकीरला सुरक्षा हवी