नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने 9 सप्टेंबर 2021 रोजी केलेल्या पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये कांहीसा बदल करत 5 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक पदावर राजकुमार शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. या आदेशावर गृहविभागाचे सचिव राहुल कुलकर्णी यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
पोलीस आस्थापना मंडळ क्रमंाक 1 यांच्या शिफारशीनुसार 9 सप्टेंबर 2021 रोजी राज्यातील पोलीस अधिक्षक पदाच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात आता कांहीसा बदल करत 13 जानेवारी 2022 रोजी पाच पोलीस अधिक्षक पदाच्या बदल्यांमध्ये काहीसा बदल करून नविन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
या बदल्यामध्ये नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील रिक्त पदावर राजकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या जीवनाची सुरूवात नांदेडमधूनच राजकुमार शिंदे यांनी केलेली आहे. राजकुमार शिंदे हे सध्या पोलीस अधिक्षक मुख्यालय दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्या अधिकाऱ्यांची नावे, सध्याचे पद आणि कंसात नवीन पदस्थापना लिहिली आहे. तुषार पाटील-पोलीस अधिक्षक दशहतवाद विरोधी पथक, गुप्त वार्ता कक्ष तांत्रिक(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर),कल्पना बारवकर-प्राचार्य राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड पुणे (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड पुणे), शर्मिष्ठा एस.घार्गे-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेशण विभाग औरंगाबाद(उपआयुक्त राज्य वार्ता विभाग नाशिक), निकेश प्रकाश खाटमोडे-पोलीस अधिक्षक फोर्स-1 , युसीटीसी मुंबई( पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद).
राज्यात पाच पोलीस अधिक्षक पदांच्या नवीन नियुक्त्या;लाच लुचपत विभाग नांदेड येथे राजकुमार शिंदे