नांदेड,(प्रतिनिधी)- आज रविवारी कोरोना विषाणूने एकूण ६४३ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २७६८ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९४.२१ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात २६.९६ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५६.६० टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १६ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ६४३ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-८६, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०३, खाजगी रुग्णालय-०५,जिल्हा कोविड रुग्णालय-०१,अश्या ९५ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८८३८३ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४.२१ टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-३६४, मुखेड-२७, कंधार-१९, नांदेड ग्रामीण-३७, किनवट-२१, मुदखेड-५०, बिलोली-१६, अर्धापूर-०१, देगलूर-११, लोहा- १५, नायगाव-०७, भोकर-०४, हिमायतनगर-०३, उमरी-०४,धर्माबाद-१४, वाशीम-०७, परभणी-२०, हिंगोली-०३, यवतमाळ-०१, अमरावती-०१, अकोला-०४, जालना-०५,गडचिरोली- ०१,गोंदिया-०१,तेलंगणा-०१,दिल् ली-०१, भिवंडी-०१,लातूर-०१,बुलढाणा-०१, औरंगाबाद-०२,असे आहेत.
आज २३८५ अहवालांमध्ये १६४६ निगेटिव्ह आणि ६४३ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९३८०६ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ५५८ आणि ८५ अँटीजेन तपासणीत असे एकूण ६४३ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ८७ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०९ आहेत.
आज कोरोनाचे २७६८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -२१९३, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-५३०,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२१, खाजगी रुग्णालयात- १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०७ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.