नांदेड,(प्रतिनिधी)- डॉ.आंबेडकर नगर जेष्ठ महीला नागरीक द्रोपदाबाई गोपाळराव चित्ते यांचे आज निधन झाले आहे.
डॉ. आंबेडकर नगरातील जेष्ठ उपासिका द्रोपदाबाई गोपाळराव चित्ते वय वर्ष 85 यांचे सायंकाळी चार वाजता दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा आज दिनांक 16 जानेवारी 2022 रोज रविवार रात्री दहा वाजता त्यांचे निवासस्थान डॉ. आंबेडकर नगर येथून निघून शांतीधाम गोवर्धन घाट स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दैनिक गोदातीर समाचारचे उपसंपादक रमेशदादा चिते व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील कर्मचारी प्रकाश चित्ते यांच्या त्या मातोश्री होत .