शेख जाकीर शेख सगीरचा नवीन कारनामा; स्वत:च्या सुरक्षेसाठी स्वत:कडे असलेली पिस्तुल रिट याचिकेत लपवली

नांदेड(प्रतिनिधी)-उधारीच्या अधिकारात सुर्याजी पिसाळाने बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्षाला पुन्हा एकदा पोलीस सुरक्षा कशी देता येईल यासाठी केलेली मरमर समोर आली आहे. खरे तर शेख जाकीर शेख सगीरकडे स्वत:च्या सुरक्षेसाठी पिस्तुल असतांना पोलीसच का पाहिजे हा अट्टहास उच्च न्यायालयासमोर येईल तेंव्हा स्वत:कडे असलेले पिस्तुल न्यायालयात सांगितले नाही तेंव्हा काय होईल?
आपल्याला कोणीच जाब विचारु शकत नाही हा विचार पोलीस सुरक्षेच्या आधारावरच शेख जाकीर शेख सगीरने चालवलेला होता. 22 डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा पोलीसांनी त्याची पोलीस सुरक्षा काढली. त्याबाबत शेख जाकीर शेख सगीरने आपल्याला जीवाचा धोका आहे असे सांगत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली. पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी तक्रार देवून दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने माजी पोलीस सुरक्षा काढण्यात आली आहे ती मला परत मिळावी असा या रिट याचिकेचा आशय आहे. यामध्ये सुर्याजी पिसाळाने लिहिलेले काही अहवाल त्याच्याकडे आहेत. ते त्याने न्यायालयात दाखल केले आहेत. कांही दिवस राज्याचा कारभार ताकाला आली आणि मालकीण झाली या पध्दतीने सुर्याजी पिसाळाने चालवला होता. त्यावेळी त्याची पुन्हा फेरतपासणी करा असा आदेश दिला होता. या आदेशाला काही मिर सादीक आणि मिर जाफर फितुर झाले आणि त्यांनी पुन्हा तसा अहवाल पाठविल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. पण रिट याचिकेची सुनावणी होण्याअगोदर राज्याचे मुख्य हक्कदार परत आले आणि सुर्याजी पिसाळाने चालवलेल्या खलबतात मिठ पडले.
रामप्रसाद खंडेलवाल यांनी दिलेल्या तक्रारी आणि त्यातून दाखल झालेले गुन्हे खोटे आहेत काय? हा प्रश्न शेख जाकीर शेख सगीरने आपल्या याचिकेत स्वत: न्यायाधीश होवून नकारात्मक उत्तर दिले आहे. सोबतच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 169 प्रमाणे पोलीस मला दोषमुक्त करणार आहेत असे भाकित सुध्दा केले. त्यावेळी शेख जाकीर शेख सगीरने केलेल्या कृत्यांबद्दल तक्रार न देता रामप्रसाद खंडेलवालने त्याची विचारणा करायला हवी होती काय? असे केले असते तर आरटीआय कार्यकर्त्यावर रामप्रसाद खंडेलवालने हल्ला केला असा गुन्हा दाखल करायला सुर्याजी पिसाळ, मिर सादीक आणि मिर जाफर सारख्या राज्याच्या गद्दारांनी कांहीच वेळ लावला नसता. रामप्रसाद खंडेलवाल यांनी तक्रार देवून कायदेशीर मागणी केलेली आहे. सत्याचा शोध घ्यायचा असेल तर उच्च न्यायालयाने सुध्दा यात गुप्तरितीने सर्व माहिती घेणे गरजेचे आहे. पोलीसाच्या सुरक्षेवरच 2013 पासून शेख जाकीर शेख सगीरचा धंदा सुरू आहे. 2013 मध्ये सुध्दा सुर्याजी पिसाळ नांदेडलाच होता.
आपल्या याचिकेत शेख जाकीर शेख सगीरने स्वत:कडे पिस्तुल आहे ही बाब लिहिलेली नाही. अर्थात लपवली आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर रिट याचिकेचे उत्तर देण्याची जबाबदारी आहे त्यांनी याबाबत अत्यंत सावधानता बाळगण्याची गरज आहे. नाही तर हा शेख जाकीर शेख सगीर त्यांच्यावर कधी उलटेल हे आज सांगता येणार नाही. आपला शासनाने, पोलीसांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली पिस्तुल सुध्दा स्वत:च्या सुरक्षेसाठीच आहे. मग पोलीस कर्मचारी तोही गणवेशात आणि स्वत:च्या कमरेला पिस्तुल लावूनच त्याला हवा आहे. असे का हवे आहे याचा शोध सुध्दा उच्च न्यायालयाने घेण्याची गरज आहे. उद्या दि.17 जानेवारी रोजी या रिट याचिकेवर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात बसलेले न्यायमुर्ती सुध्दा एका शब्दावरून सत्याचा धागा पकडतात हे कोणीच विसरायला नको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *