नांदेड(प्रतिनिधी)-थेरबन ता.भोकर येथे एका 50 वर्षीय माणसाने शेत माझ्या नावाने कर नाही तर खतम करतो या धमकीला भिऊन आत्महत्या केली आहे.
मारोती काटेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 7.10 या वेळेत व दि.8 जानेवारी रोजी गावातील एका व्यक्तीने विठ्ठल मारोती काटेवाड (50) यांना धमकी दिली की, तु आमच्या नावाने शेत कर नाही तर तुला खतम करतो यावेळी त्यांना थापडबुक्यांनी मारहाण करण्यात आली. विठ्ठल मारोती काटेवाड यांनी या भितीपोटी आत्महत्या केली आहे. भोकर पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक तांबोळी अधिक तपास करीत आहेत.
50 वर्षीय माणसाने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली; गुन्हा दाखल