नांदेड(प्रतिनिधी)-8 जानेवारी रोजी घडलेल्या स्फोटाची गुप्त माहिती इतवारा पोलीसांना 13 जानेवारी रोजी प्राप्त झाली. त्यानुसार 8 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 8 दरम्यान शांतीनगर भागातील दिपक धोंगडे यांच्या राहत्या घरी कोणत्या तरी स्फोट झाला आहे. त्यात दिपक धोंगडे जखमी झाले आहेत. हे स्फोटक साहित्य केशव पवार नावाच्या त्यांच्या नातलगाच्या ताब्यात आहेत. या घराची झडती घेतली असता तेथे अनेक डिटोनेटर सापडले आहेत. या डिटोनेटरची संख्या 10 आहे. याबाबत पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 14 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांनी 13 जानेवारी रोजी दिपक दिगंबर धोंगडे याच्या घरातील 10 डिटोनेटर ताब्यात घेतले आहेत. 8 जानेवारी रोजी स्फोट झाल्यानंतर दिपक दिगंबर धोंगडे हा जखमी झाला आणि तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्या प्रकरणाची एमएलसी 9 जानेवारी रोजी प्राप्त झाली. त्यात घरी बल्प लावत असतांना स्फोट झाला आणि त्याचा मार लागला असे नातेवाईक सांगत आहेत. त्यावेळी माझी भाऊजी केशव शिवाजी पवार हे कसली तरी लाईट सारखी वस्तु कॅरीबॅगमध्ये आणून माझ्या मोठ्या सावत्र आईच्या घरात ठेवली होती. ते काय आहे हे पाहत असतांना एक लाईट काढून ती बोर्डात लावली असता जोराचा आवाज झाला आणि त्यातून निघालेल्या वस्तुंमुळे माझ्या दोन्ही हातांवर व पोटावर मार लागला. पण माझा कोणावर काही संशय नाही असे सांगितले.
याबाबत दिपक दिगंबर धोंगडे याची पोलीस कोठडी मिळाली. यासंदर्भाने अनेक वर्तमान पत्रांमध्ये या घटनेला कांही तरी मोठे स्वरुप देण्याचा प्रयत्न झाला पण प्रत्यक्षात या घटनेसंदर्भाने तशी काहीच माहिती तपासात प्राप्त झाली नाही.याबाबत पापुलर फ्रंट ऑफ इंडियाचे सचिव करीम ईनामदार यांनी दिपक धोंगडे हा आपल्या घरी रासायनीक स्फोटक पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करीत होता की, सराव करीत होता. ज्यामुळे नांदेड शहरात किंवा देशात हल्ला घडवून आणण्याची योजना आहे. अशा शंकेचा भास होता. पण पोलीसांनी या तपासात असे कांहीच प्राप्त झाले नसल्याचा गुन्हे प्रगती अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे.
घातपात घडविण्यासाठी शांतीनगर भागात स्फोट घडवला नाही ;पोलीसांचा गुन्हे प्रगती अहवाल