नांदेड,(प्रतिनिधी)- आज मंगळवारी कोरोना विषाणूने एकूण ४५१ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३१०० आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.९२ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात २८.७९ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५७.८७ टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १८ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ४५१ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-२९२, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०३, खाजगी रुग्णालय-०४, तालुक्यातील गृह विलगीकरण-१७,अश्या ३१६ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८८९०० झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.९२ टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-२६१, मुखेड-२१, नांदेड ग्रामीण-३६, किनवट-०१, मुदखेड-०१,हदगाव-०४,बिलोली-२३, अर्धापूर-०२,देगलूर-०७, लोहा- ११,नायगाव-१२,भोकर-०२, उमरी-१८, धर्माबाद-०७,,हिमायतनगर-०१, परभणी-१५, हिंगोली-०६,वाशीम- ०१,बिलोली-०४,
कोल्हापूर-०१, जालना-०३,हैद्राबाद-०८, लातूर-०२,औरंगाबाद-०२,
दिल्ली-०१,अमरावती-०२,नागपूर- ०१,निझामाबाद-०२,असे आहेत.
आज १५६६ अहवालांमध्ये १०६० निगेटिव्ह आणि ४५१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९४६५५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ३७४ आणि ७७ अँटीजेन तपासणीत असे एकूण ४५१ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०९आहेत.
आज कोरोनाचे ३१०० ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -२४३३, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-६१०,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३२, खाजगी रुग्णालयात- १५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०७ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.