नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव शहरातील मोंढा मार्केट भागातील दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 95 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.शिवाजीनगर हद्दीत विसावा जलतरणीकेजवळ एक जबरी चोरी झाली आहे. त्यात 7 हजारांचा मोबाईल चोरण्यात आला आहे.
भगवान माधवराव जुन्ने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता ते आणि त्यांच्या शेजारचे दुकानदार आपले कृषी दुकान बंद करून घरी गेले. 17 जानेवारीला सकाळी 7.30 वाजता त्यांची दुकाने फोडल्याची माहिती मिळाली. तपासणी केली असता कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला आणि एकूण 1 लाख 95 हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बाचावार अधिक तपास करीत आहेत.
नामदेव कुंडलिक लटपट हे 17 जानेवारी सकाळी 6.30 वाजता विसावा उद्यान जलतरणीकेसमोरून पायी रेल्वे स्टेशनकडे जात असतांना तीन चोरटे दुचाकी गाडीवर आले आणि त्यांच्या खिशातील 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरिक्षक भगवान सावंत अधिक तपास करीत आहेत.
नायगाव येथील दुकाने फोडली 1 लाख 95 हजार रुपये रोख रक्कमेची चोरी