नांदेड(प्रतिनिधी)-सन 2018 च्या वर्षी एका चार चाकी गाडीकडून 35 “मोदकांचा प्रसाद’ घेवून ती मास असलेली गाडी सोडून दिलेल्या प्रकरणात डिसेंबर 2021 मध्ये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा देण्याचे आदेश अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. या आदेशात दोघांना मिळून एक हजार की प्रत्येकाला एक हजार याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
दि.13 सप्टेंबर 2018 रोजी त्यावर्षीच्या गणेश उत्सवाचा पहिला दिवस होता. ठिक-ठिकाणी लावलेल्या फिक्स पॉईंटवर असलेल्या पोलीसांनी आणि गस्ती पथक कार्यरत असतांना एक गस्तीपथकाला एक चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.24 ई.7040 यामध्ये मास घेवून जात असल्याची माहिती मिळाली. गस्ती पथकातील पोलीसांनी ही माहिती आपल्या पोलीस निरिक्षकांना फोनवर दिली. अत्यंत कायदेशीर पोलीस निरिक्षक यांनी त्या गाडीवर ताब्यात घेवून खात्रीकरून कायदेशीर कार्यवाही करा असे आदेशित केले. परंतू त्या पथकातील दोन पोलीसांनी ती चार चाकी गाडी सोडून दिली.
त्यानंतर वाजेगाव वळण रस्त्याजवळ ही चार चाकी गाडी क्रमांक 7040 जी मास भरलेली गाडी होती. ती गाडी नांदेड ग्रामीण पोलीसांनी सोडून दिल्याचे वृत्तप्रकाशित झाले. त्यानंतर तुम्हाला मेमो देवून त्या वाहनावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. तरी सुध्दा तुम्ही ती कार्यवाही केलेली नाही. तुम्हाला कायद्याच्या विषयीची संपूर्ण जाणीव असतांना व वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांकडे जाणीव पुर्वक आपण दुर्लक्ष केले आहे त्याकरीता त्यांना एक हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात येत आहे असे या आदेशात लिहिलेले आहे. मोदकांच्या प्रसादात हात असणाऱ्या हे दोन पोलीस कर्मचारी दिलीप गोविंदराव चक्रधर(बकल नंबर 616) आणि चंद्रकांत सुभाषराव स्वामी (बकल नंबर 3376) नेमणूक नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे असे आहे. शिक्षेच्या या आदेशात दोघांना मिळून एक हजार रुपये दंड की प्रत्येकाला एक हजार रुपये दंड याचा सविस्तर उल्लेख या आदेशात नाही. हा आदेश दि.11 डिसेंबर 2021 रोजी पारीत केलेला आहे.
2018 मध्ये 35 मोदकांचा प्रसाद घेवून सोडलेल्या मांस गाडी प्रकरणात दोन पोलीसांना शिक्षा ; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रकार