डिटोनेटर प्रकरणातील दुसरा आरोपी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-डिटोनेटर सापडल्यानंतर त्यातील दुसरा आरोपी ज्याने डिटोनेटर आणले होते. यास आज 20 जानेवारी रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी दोन दिवस, 22 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
13 जानेवारी रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 13/2022 मध्ये दिपक दिगंबर धोंगडे यांच्या घरात 8 जानेवारी रोजी एक स्फोट झाला होता. पोलीसांनी दिपक धोंगडेला अटक केली. त्याने सांगितले की, त्यांचा नातलग केशव शिवाजी पवार (41) रा.परभणी याने ते आणून ठेवले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे होता.या प्रकरणावर पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे बारकाईने लक्ष ठेवून होते.
आज पहाटे इतवारा येथील एका पोलीस पथकाने केशव शिवाजी पवारला ताब्यात घेतले. त्यानंतर अटक प्रक्रिया पुर्ण झाली आणि दुपारी शेख असद, पोलीस अंमलदार राज घुले, मानेकर, केंद्रे, संघरत्न गायकवाड आदींनी डिटोनेटर प्रकरणातील आरोपी केशव शिवाजी पवारला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी या प्रकरणामुळे नांदेड शहरात भितीचे तयार झालेले वातावरण प्रकरणातील सखोल तपासानंतर स्पष्ट होणार आहे. त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी केशव शिवाजी पवारला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *