नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी अटक झालेल्या सासूला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आनेकर यांनी जामीन मंजुर केला आहे.
डोंगरगाव ता.हदगाव येथील राधेशाम भगवानराव मुलगिरसोबत शोभा या महिलेचे लग्न झाले होते. तिला बाळांतपणासाठी माहेरी आणले असता तिच्या नवऱ्याने 50 हजार रुपये घेवून सोबत ये अशी तंबी दिली होती. पण पैसे देणे झाले नाही. 14 डिसेंबर 2021 रोजी शोभाला सायंकाळी 6 वाजता दोरीने गळाआवळून तिचा खून करण्यात आला. या बाबत हदगाव पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. त्यात मयत शोभाचा नवरा राधेशाम भगवानराव मुलगिर, सासरा भगवानराव किशनराव मुलगिर आणि सासु अरुणा भगवानराव मुलगिर यांची नावे होती.
हदगाव पोलीसांनी राधेशाम भगवान मुलगिर आणि त्याची आई अरुणा मुलगिर यांना अटक केली. कायदेशीर प्रक्रियेत ते पुढे तुरूंगात गेले. त्यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला. त्यामध्ये ऍड.रंगनाथ देशमुखे, ऍड. अमनपालसिंघ कामठेकर यांनी युक्तीवाद केला आणि ऍड.सरबजितसिंघ शाहु यांनी मदत केली. युक्तीवाद ऐकून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आनेकर यांनी तुरूंगात असलेल्या 52 वर्षीय सासुला जामीन मंजुर केला आहे.
विवाहितेच्या मृत्यूस जबाबदार सासूला मिळाला जामीन