कोरोनाचा वेग सुसाटच;शनिवारी दिले ८५७ नवीन रुग्ण;उपचार घेणारे रुग्ण ४०५०

नांदेड,(प्रतिनिधी)- आज शनिवारी कोरोना विषाणूने एकूण ८५७ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४०५० आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.१३ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ३७.९५ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५६ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २२ जानेवारी रोजी कोरोना बाधेने कोणाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ८५७ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-५६६, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०२, खाजगी रुग्णालय-०२, तालुक्यातील गृह विलगीकरण-४७,जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पीटल-०२,अश्या ६१९ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९१००१ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.१३ टक्के आहे.
             आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-४८०, मुखेड-१३, नांदेड ग्रामीण-६३, किनवट-८४, मुदखेड-०५, हदगाव-०५, बिलोली-२२, अर्धापूर-०२,देगलूर-३१, लोहा-२१, माहूर-०८,कंधार-१९, नायगाव-१६,भोकर-०५,  उमरी-०६, धर्माबाद-१२,हिमायतनगर-१२, परभणी-१९,हिंगोली-०९, लातूर-१०, जालना -०३, औरंगाबाद-०२, अकोला-०१, पुसद-०२,उस्मानाबाद-०१, आदिलाबाद-०१, बीड-०१,निझामाबाद-०३,बुलढाणा-०१, असे आहेत.
                          आज २२५८ अहवालांमध्ये १२४९ निगेटिव्ह आणि ८५७ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९७७०९ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ७४९ आणि १०८ अँटीजेन तपासणीत असे एकूण ८५७ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १४५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०७ आहेत.
                                आज कोरोनाचे ४०५० ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -३२४८, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-७४३,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२७, खाजगी रुग्णालयात- २६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०३,हदगाव रुग्णालय-०१,बिलोली रुग्णालय-०२, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *