नांदेड(प्रतिनिधी)-भारतात स्त्री भु्रण हत्येचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी आम्हाला आपली स्वत:ची मानसिकता बदलून या समाजाची वास्तुविशारद असलेल्या महिलेला सुरक्षीतता मिळावी यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे असे प्रतिपादन जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या नांदेड येथील महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलेे.
दरवर्षी दि.24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे मुलींना प्रात्सोहन देणे, त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची जाणिव करुन देणे, त्यांना अधिकार समजून सांगणे, मुलगा आणि मुलगी भेदभाव न करता त्यांना ताकत प्रदान करणे, यासाठी जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या महिला विभागातर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आजच्या पत्रकार परिषदेत डॉ.आयशा पठाण, डॉ.नसरीन जुबेरी, मल्लिका फिरदोस, अरिशा तखदीश या महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या.
महिलेचा सन्मान हाच देशाचा अभिमान या घोष वाक्यासह जमात-ए-इस्लामी हिंद आपला कार्यक्रम राबवत असते. समाजाचा मुळ आधार असलेली महिला आजही असुरक्षीत का आहे यावर प्राथमिकतेने विचार करण्याची गरज आहे. नुसता कायदा करून सर्वकांही ठिक होत नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. आज महिला दुय्यम स्थानावर का आहेत. महिलेला आज आपल्या हक्कांसाठी का लढावे लागते आहे. पुरूष आणि महिलेच्या सरासरी दरामध्ये आलेला प्रभाव हा बरोबर करण्यासाठी काय करायला हवे. यावर विचार करण्याची गरज आहे. मुलगी जन्मली की, तिच्या हुंड्याचा विषय पालकांसमोर उभा राहतो आणि त्यातूनच स्त्रीभु्रण हत्या घडते म्हणून आपल्याला आई हवी, बहिण हवी, पत्नी हवी पण मुलगी नको असा झालेला समज बदलण्याची गरज आहे. 2008 पासून देशात कन्या दिवस साजरा केला जातो त्या मागे महिलेला जास्त ताकत देण्यात पुढाकार घेतला जातो. आज कायदा आहे. त्या कायद्याच्या अनुषंगाने अनेक अधिकार महिलेला प्राप्त झाले आहेत. तरीपण फक्त कायदा केला तर सर्व कांही बदलत नसते त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आवश्यक असते असे उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महिलेला सुरक्षीत वाटण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज-जमात-ए-इस्लामी हिंद