नांदेड(प्रतिनिधी)-दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीने नांदेड ग्रामीण पोलीसांनी तक्रार न्यायालयात केल्यानंतर त्या प्रकरणातील एका फरार आरोपीला इतवारा पोलीसांनी पकडून दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी आज त्यास न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत या युवकाला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.19 सप्टेंबर 2019 रोजी मोहम्मद इमरान मोहम्मद गौसच्या तक्रारीवरुन त्याला मारहाण करून 25 हजार रुपये रोख रक्कम लुटल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आतापर्यंत जवळपास 14 आरोपींना अटक झाली आहे. त्यातील एक रबज्योतसिंघ उर्फ गब्या जसविंदरसिंघ तिवाना (22) यास इतवारा पोलीसांचे गुन्हे शोध प्रमुख पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, हबीब चाऊस आणि ज्ञानेश्र्वर कलंदर यांनी पकडले. इतवारा पोलीसांनी रबज्योतसिंघला नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केल्यानंतर 23 जानेवारीच्या रात्री 2.34 वाजता अटक झाली.
या प्रकरणात आज दि.23 जानेवारी रोजी पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी रबज्योतसिंघला न्यायालयात हजर केले. त्या गुन्ह्यात अगोदर आरोपींची नावे नव्हती मग ती एक-एक वाढत 15 झाली असे न्यायालयासमक्ष सांगण्यात आले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश जी. सी.फुलझळके यांनी रबज्योतसिंघला 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
इतवारा पोलीसांनी पकडलेल्या आरोपीला नांदेड ग्रामीण पोलीसांनी घेतले पोलीस कोठडीत