नांदेड(प्रतिनिधी)-18 डिसेंबर रोजी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह तर सापडला नाही पण त्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात आज एकाला 18 वर्ष 1 महिना वय दाखवून न्यायालयात हजर केल्यानंतर तो आरोपी घटनेच्या दिवशी तीन ते चार दिवसांनी 18 वर्षापेक्षा कमी आहे हे दिसल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.सी.फुलझळके यांनी त्या गुन्हेगाराला बाल न्यायामंडळासमक्ष हजर करण्यास सांगितले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका खूनाच्या गुन्ह्याचा विशेष अहवाल पाठवला गेला. त्यात त्या गुन्ह्याचा क्रमांक 39/2022 असा लिहिलेला आहे. या प्रकरणात आज दुपारी न्यायालयात दाखल केलेल्या पोलीस कोठडीच्या यादीत या गुन्ह्याचा क्रमांक 41/2022 असा लिहिलेला आहे. या प्रकरणात सुनिल सुलगेकर (21) या युवकाचा खून 18 डिसेंबर ते 22 जानेवारीदरम्यान घडला. त्याची जागा निश्चित नाही असे लिहिलेले आहे. या विशेष अहवालात पाच आरोपींची नावे लिहिलेली आहेत.
आज 23 जानेवारी रोजी दुपारी सुनिल सुलगेकरचा खुन करणाऱ्या पाचपैकी एकाला न्यायालयात आणले होते. न्यायालयाच्या अभिलेखात या आरोपीचे वय 18 वर्ष 1 महिना असल्याचे दाखविण्यात आले होते. आरोपीला न्यायालयात नेण्याअगोदर त्याच्या समोर उभे राहुन कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड त्यास सुचना देत होते. न्यायालयात मात्र पोलीस कोठडीचा युक्तीवाद झाल्यानंतर आरोपींच्यावतीने ऍड.मोहन बंटे यांनी हा आरोपी 18 डिसेंबर 2021 रोजी 18 वर्ष पुर्ण होण्यासाठी त्या आरोपीला तीन दिवस कमी आहेत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. हा अभिलेख सुध्दा पोलीसांनीच आणलेला होता. त्यानंतर न्यायाधीश जी.सी. फुलझळके यांनी पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांना बोलवले होते. पण अभिलेख पोलीसांनीच दाखल केलेला आहे. म्हणून या आरोपीला बाल न्यायमंडळासमक्ष हजर करण्याचे आदेश न्यायाधीश फुलझळके यांनी दिले आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी स्वत: आणलेल्या अभिलेखानुसार विधीसंघर्षग्रस्त बालकाला नियमित न्यायालयासमक्ष हजर केले