नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हेगारांना शासन करा अशा घोषणा देत सीपीएम पक्षाच्या झेंड्यासोबत काही काळे झेंडे घेवून डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या खूनाचा निषेध करत कांही जणांनी वजिराबाद भागातून मोर्चा काढला. दुकानांना बंद करण्याचे आवाहन ही मंडळी करत होती.
उमरखेड येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत धर्मकारे यांचा खून झाला. या प्रकरणात यवतमाळ पोलीसांनी भरपूर परिश्रम करून 48 तासांच्या आत या खूनाचा कट रचणाऱ्या चार जणांना गजाआड केले. प्रत्यक्षात डॉ.धर्मकारेंवर गोळी झाडणारा आरोपी पोलीस अजून शोधत आहेत. या घटनेविरुध्द सीपीएम पक्षाचा झेंडा आणि कांही काळे झेंडे घेवून गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे अशा घोषणा देत कांही जणांनी वजिराबाद भागातून मोर्चा काढला. यामध्ये अनेक समाज बांधव उपस्थित होते.
