सोमवारी कोरोना संख्या ३०२ ने घटली;सोमवारी दिले ४८४ नवीन रुग्ण;एका पुरुष रुग्णाचा मृत्यू

नांदेड,(प्रतिनिधी)- आज सोमवारी कोरोना विषाणूने एकूण ४८४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४२५८ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९२.९० झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ३१.२८ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ६२.१९ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २४ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एका ४६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. धानोरा ता. लोहा येथील आहेत दगावले पुरुष रुग्ण. आज ४८४ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-४६९, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०५, खाजगी रुग्णालय-०३, तालुक्यातील गृह विलगीकरण-७५,बिलोली-०२,अश्या ५५४ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२०६२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९२.९० टक्के आहे.
             आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-३०१, मुखेड-२७, नांदेड ग्रामीण-४०, किनवट-०३, मुदखेड-०९, हदगाव-०७, बिलोली-०३, अर्धापूर-१४,देगलूर-०५, लोहा-२५,कंधार-०३,
नायगाव-०३, भोकर-०५,  उमरी-०२, धर्माबाद-०३,
परभणी-२२,हिंगोली-०२, औरंगाबाद-०३, यवतमाळ-०१,  उमरखेड-०२, हिमायतनगर-०२,बीड-०१,आदिलाबाद-०१, असे आहेत.
                          आज १५४७ अहवालांमध्ये १००० निगेटिव्ह आणि ४८४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९८९७८ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ४४५ आणि ३९ अँटीजेन तपासणीत असे एकूण ४८४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ६० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०३ आहेत.
                                आज कोरोनाचे ४२५८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -३२०५, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-९८२,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३३, खाजगी रुग्णालयात- ३०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०७,हदगाव रुग्णालय-०१, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०५ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *