विद्युत मिटर देण्यासाठी 10 हजारांची लाच स्विकारणारा शासकीय विद्युत कंत्राटदार गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता उमरीने स्वत: लाच न स्विकारता विद्युत कंत्राटदारामार्फत एका हॉटेल व्यावसायीकाला विद्युत मिटर बसविण्यासाठी मागितलेली दहा हजार रुपये लाच त्या विद्युत कंत्राटदाराने स्विकारल्यानंतर त्यास अटक करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली.
एका तक्रारदाराने नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 18 जानेवारी रोजी तक्रार केली की, कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी उमरी हे त्यांच्या हॉटेलवर व्यावसायीक विद्युत मिटर बसविण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करत आहेत. याबाबत 20 जानेवारी रोजी लाच पडताळणी केली तेंव्हा कनिष्ठ अभियंता विद्युत मंडळ उमरी यांनी लाचेची मागणी न करता तक्रारदारास शासकीय विद्युत कंत्राटदार बालाजी गोविंद वाघमारे यांच्याकडून काम करून घेणे व या कामासाठी शासकीय कोटेशन भरणे बाबत सांगितले. याबाबत विद्युत कंत्राटदार वाघमारे यांच्याकडे लाच मागणीची पडताळणी केली असता त्याने शासकीय कोटेशन व्यतिरिक्त एमएसईबी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नावावर स्वत: 10 हजार रुपये लाच मागणी केल्याचे दिसले.
त्यानुसार 25 जानेवारी रोजी हरीओम हॉटेल महाराणा प्रताप चौक हिंगोली नाका येथे लावण्यात आलेल्या सापळ्या दरम्यान शासकीय विद्युत कंत्राटदार बालाजी गोविंद वाघमारे (49) रा.बसंतानगर, नुरी चौक, ग्यानमाता हायस्कुलजवळ नांदेड याने 10 हजार रुपयांची लाच स्विकारली आणि त्वरीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीसांनी त्यास जेरबंद केले. विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मिना बकाल करीत आहेत.
ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, मिना बकाल, पोलीस अंमलदार गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, राजेश मुंडे, ईश्र्वर जाधव आणि गजानन राऊत यांनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *