नांदेड,(प्रतिनिधी)- आज गुरुवारी कोरोना विषाणूने एकूण ४५७ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४१६४ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.२० झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ३२.८३ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५२.५१ टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २६ जानेवारी रोजी कोरोना बाधेने काझी गल्ली हिमायतनगर येथील एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे आज पर्यंत कोरोना बाधेने मरण पावणाऱ्यांची संख्या २६६५ झाली आहे.आज ४५७ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-३७७, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०८, खाजगी रुग्णालय-०८, तालुक्यातील गृह विलगीकरण-१०५,अश्या ४९८ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९३६७२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.२० टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-२४०, मुखेड-०२, नांदेड ग्रामीण-४४, किनवट-२२, मुदखेड-०३, हदगाव-०४, भोकर-०७, बिलोली-०३, अर्धापूर- ०५,देगलूर-४५, लोहा-०१,कंधार- ०४,नायगाव-११, धर्माबाद-०१, हिमायतनगर-०१,उमरी-२२,लातूर-०२, औरंगाबाद-०२, परभणी-०९, हिंगोली -०९, पुणे-०२,अकोला-०२, पंजाब-०१, आदिलाबाद-०३,वाशीम-०३,हैद्राबा द-०२,हरियाणा-०३, उत्तरप्रदेश -०१,तेलंगणा-०२,बिहार-०२, असे आहेत.
आज १३९२ अहवालांमध्ये ९२५ निगेटिव्ह आणि ४५७ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १००५०१ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ४१८ आणि ३९ अँटीजेन तपासणीत असे एकूण ४५७ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०५ आहेत.
आज कोरोनाचे ४१६४ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -२९०८, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-११७६,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३६, खाजगी रुग्णालयात- ३९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०३,किनवट-०२, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.