भिक्षा मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीयांमध्ये झाले भांडण

नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या भागात भिक्षा मागण्यास का आला या कारणावरून चार शिखंड्यांनी (तृतीयपंथी) एकाला मारहाण करून हाताचे हाड तोडले. रामतिर्थ पेालीसांनी चार शिखंड्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मनिषा गौरी बकस या तृतीय पंथ्याने दिलेल्या तक्रारीनुसार 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास जिगळा ता.नायगाव येथे फरिदा उर्फ फयाज शेख, सलीम शेख उर्फ सलमा, गिता पायल ठाकरे उर्फ सुरे आणि मुद्दसिर बागवान उर्फ फिदा सर्व रा.जिगना ता.नायगाव यांनी मनिषा गौरी बकसला तुम्ही आमच्या भागात भिक्षा मागण्यास का आलात म्हणून वाद घातला. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. काठीच्या सहाय्याने पाठीत, डोक्यात, मारुन जखमी केले आणि हाताचे हाड मोडले. रामतिर्थ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 15/2022 कलम 325, 324, 323, 504, 506 आणि 34 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी. जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार आडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *