नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलातील एक पोलीस उपनिरिक्षक तीन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाल्यावर पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांना भावी आयुष्यातील जीवनासाठी शुभकामना देत पोलीस दलातून निरोप दिला.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील नियंत्रण कक्ष येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक विश्र्वनाथ विठ्ठल बोईनवाड, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बालाजी शंकरराव कदम (पोलीस ठाणे लिंबगाव), मधुकर चंद्रअप्पा कोटेवार(पोलीस ठाणे किनवट), प्रकाश अर्जुनराव ढवळे(पोलीस ठाणे धर्माबाद), पोलीस अंमलदार शिवाजी गंगाराम केंद्रे (पोलीस ठाणे माळाकोळी ) आणि महादेव खुशालराव केंद्रे (पोलीस ठाणे अर्धापूर) असे सहा जण आपल्या जीवनातील पोलीस सेवा पुर्ण करून आज 31 जानेवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब उबाळे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिवाजी लष्करे यांच्या उपस्थितीत या सर्व सेवानिवृत्त पोलीसांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी सन्मान करून भावी जीवनासाठी शुभकामना देत आज पोलीस दलातून निरोप दिला. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, महिला पोलीस राखी कसबे, रुपा कानगुले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले.
जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस उपनिरिक्षक, तीन एएसआय आणि दोन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त