नांदेड -एका शेतकऱ्याचा मुलगा शिकून मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी झाला. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरिक्षक बनला. आज तोच शेतकरी पुत्र नांदेडचा नगरसेठ असलेल्या वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहे. आपल्या वजिराबाद येथील नियुक्तीचे एक वर्ष पुर्ण केल्याबद्दल त्यांच्यासाठी कांही शब्दांमधून आम्ही आदर व्यक्त करत आहोत.
देगलूर गावात श्री राजन्नाजी भंडरवार यांच्या कौटूंबिक मळ्यात 6 आपत्यांनी जन्म घेतला. त्यात पाच मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. राजन्नाजींचा एक मुलगा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अभियंता झाला. दुर्देवाने कोरोना काळात त्यांचा मृत्यूपण झाला. त्यानंतरच्या मुलांमध्ये जगदीश हा एक होता. त्याने 12 पर्यंतचे शिक्षण देगलूर शहरात घेतले आणि पुढचे पदवी शिक्षण कृषी विद्यापीठ परभणी येथे पुर्ण केले. कृषी विद्यापीठामध्ये असलेल्या शासकीय सेवेतील नोकरी मिळविण्यासाठी मेहनत घ्यायची या ध्येयाला जगदीशने आपल्या मनात बसवले आणि 1995 मध्ये मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर काम करण्याची सुरूवात शासकीय सेवेतून केली. 1996 मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केली आणि पोलीस उपनिरिक्षक या पदावर आपले नाव कोरले. देगलूर गावात आणि जगदीश भंडरवार यांच्या समाजात पहिला व्यक्ती पोलीस उपनिरिक्षक झाला.
प्रेम तर स्वत:हून जवळ येत असते
जेंव्हा कोणी तरी कोणाच्या नशिबात असते..
या उक्तीप्रमाणे त्यांच्या नशिबात देगलूर येथील सौ.सुनंदाजींचे आगमन झाले. त्यांच्या कौटूंबिक जीवनात श्रेया आणि श्वेता या दोन कळ्यांनी आपल्या आगमनाने आनंदाचा सुहास पसरवला. आपल्या पोलीस जीवनाची सुरुवात करतांना 1997 ते 2002 या कालखंडात जगदीश भंडरवार यांनी नागपूर शहरात काम केले. 2002 मध्ये त्यांनी अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षा विभागात आपल्या कार्याचे कौशल्य दाखवले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी आणि मुखेड या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदांवर काम केले. सन 2009 मध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती प्राप्त करून त्यांनी अमरावती शहर, लातूर, आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागात काम केले. पुढे उसमानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि वाशी या पोलीस ठाण्यांमध्ये आपली सेवा देत सन 2013 मध्ये त्यांनी पोलीस निरिक्षक पदोन्नती प्राप्त केली. लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरिक्षक पदाच्या कामकाजाची सुरूवात करत त्यांनी पुढे हिंगोली जिल्ह्यात आले. हिंगोली शहर आणि हिंगोली ग्रामीण या दोन पोलीस ठाण्यात आपले काम आणि आपल्यातील चुणूक दाखवत त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेत आपले काम केले. त्यानंतर त्यांची बदली नांदेड जिल्ह्यात झाली. नांदेड जिल्ह्यात आल्यावर कांही दिवस वेगवेगळी पोलीस ठाणी आणि पोलीस उपअधिक्षक गृहविभाग या पदावर काम केले. 30 जानेवारी रोजी त्यांची नियुक्ती नांदेड शहराच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात झाली आणि आज त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यातील आपल्या कार्यकाळाची एक वर्ष पुर्ण केली.

नांदेड जिल्ह्याच्या स्थापनेचा ईतिहास आठवला तर नांदेड शहरात फक्त एकच पोलीस ठाणे होते आणि ते पोलीस ठाणे वजिराबाद आहे. त्यानंतर चौफाळा(इतवारा), शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्यांची वाढ झाली. पण वजिराबाद पोलीस ठाणे हे त्याळीवेळेस आणि आजही नांदेड शहराच्या हृदयात वसलेले आहे. अर्थात वजिराबाद पोलीस ठाणे हे शहराच्या केंद्रस्थानी असल्यामुळे या पोलीस ठाण्यात नियुक्ती होणाऱ्या पोलीस निरिक्षकाला नगरसेठ असे म्हटले जायचे. आजही जगदीश भंडरवार या नगरसेठ पदावर कार्यरत आहेत. सेठ हा शब्द वापरला म्हणजे तो श्रीमंतीचा विषय आहे असे वाटते. पण सेठ हा जुन्या काळातला शब्द आहे आज आम्ही या शब्दाला केंद्रास्थानी काम करत असतांना त्या व्यक्तीमध्ये असलेली पात्रता आणि त्या पात्रतेच्या अनुषंगाने त्यावर देण्यात आलेली जबाबदारी अशा अर्थाने उल्लेखीत केला आहे. नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रेल्वे स्थानक, बसस्थानक, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, मुख्य डाक घर, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तुरूंग अशी महत्वाची कार्यालये आहेत. सोबतच सचखंड श्री हजुर साहिब यांचा दरबार याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्या दरबाराला तर आंंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त आहे. त्यामुळे वजिराबाद पोलीस ठाण्यात या सर्व विभागांना कांही ना काही कारणाने यावेच लागते. आणि त्यामुळेच आम्ही जगदीश भंडरवार यांच्यामध्ये असलेल्या उच्च विचारांच्या भक्कम पायावर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते. या सज्ञेतून त्यांचा उल्लेख नगरसेठ असा केला आहे. नगरसेठ या पदावर कार्यरत असतांना त्या पदाची जबाबदारी खुप मोठी आहे. फक्त सेठ म्हणजे म्हटले की, म्हणजे सर्व कांही आपोआप होत नसते. त्यासाठी अत्यंत मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेतांना आपण खुश नसतांना सुध्दा इतरांना आम्ही अत्यंत आनंदी आहोत असे दाखवावे लागते. हा त्या पदामागचा सर्वात मोठा मेहनतीचा प्रकार आहे आणि ही मेहनत घेत आपले भविष्य आपणच स्वत: रेखीत करत आपल्याच तयार केलेल्या चित्रांमध्ये आपणच रंग भरत जगदीश भंडरवार यांनी आपल्या नियुक्तीचे एक वर्ष पुर्ण करतांना हारतांना सुध्दा आपण रडायचे असते आणि जिंगल्यानंतर सुध्दा आपल्यालाच हसायचे असते हे प्रत्यक्षात दाखवून दिले.
आपल्या जीवनामध्ये बोलतांना जगदीश भंडरवार सांगतात मी पोलीस उपनिरिक्षक झाल्यानंतर माझ्या पदाकडे पाहुन अनेकांनी ते पद मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि माझ्याकडे मागणी केलेली मदत मी त्यांना दिली आणि त्यातून ते माझ्यापेक्षा मोठ्या पदावर आज कार्यरत आहेत. हे मला आनंदाने सांगायचे आहे. आपल्या जीवनातील कांही घटना त्यांनी सांगितल्या आहेत. ज्या आधारे जगदीश भंडरवार नसते तर.. अशी परिस्थिती त्या व्यक्तींच्या जीवनात तयार झाली होती आणि जगदीश भंडरवार यांनी आपल्या जीवनाचा अमुल्य असा वेळ त्यांच्या समस्येसाठी अर्पण करून त्यांच्या जीवनात आनंदाचे इंद्रधनुष्य उजळीत केले. आपल्या सर्व सहकारी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या मेहनतीमुळे मी आज या पदावर कार्यरत आहे. कारण त्यांच्या मेहनतीनेच माझ्या पदाची शान वाढत असते असे जगदीश भंडरवार यांना वाटते.जगदीश भंडरवार यांचे शब्द ऐकल्यावर जगातला प्रत्येक व्यक्ती हा आपल्या योग्यतेनुसार चमकतच असतो हे नक्कीच म्हणावे लागेल.
आपल्या जीवनाती वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल बोलतांना जगदीश भंडरवार यांच्या शब्दात अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्रकुमार सिंगल, के.व्यंकटेशन, पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या बद्दलचे शब्द या सर्व अधिकाऱ्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रयत्न सांगतात. आणि त्यांनी या अधिकाऱ्यांकडून मिळवलेल्या धड्यांच्या आधारावर आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जोडत आज कार्यरत आहेत. श्री राजन्नाजी आपल्या मुलाचे नाव जगदीश असे ठेवले या शब्दाचा अर्थच Rular of the world (जगावर राज्य करणारा )असा आहे त्यामुळे त्यांनी या अर्थाला महत्व देता येईल या प्रमाणे काम करावे अशी अपेक्षा आहे.
जगदीश भंडरवार यांच्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण आठवण देवून जाईल आणि जाणारा प्रत्येक क्षण आठवण ठेवून जाईल. या आठवणींच्या अंबारामध्ये त्यांनी नक्कीच आपल्या जीवनाला साठवून ठेवले तर त्यातून निर्माण होणारा सुगंध आसमंत दरवळून टाकेल. जगदीश भंडरवार यांना सांगावेसे वाटते की, माणस ही प्रेम करण्यासाठीच असतात, आणि पैसा हा वापरासाठी असतो पण आज हे उलट झाले आहे. आज पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणस ही वापरली जात आहेत. पण आपण असे कांही करू नका. तुमच्या जीवनात घडलेल्या घटनांमधून जे कांही तुम्ही पाहिले, जे कांही अनुभवले, ज्यावर तुम्हाला चालावे लागले, वळणे घ्यावी लागली हे सर्व करत असतांना ज्यांना तुमच्या अश्रुंची किंमत कधी नाही, त्यांच्यासाठी कधीच रडू नका.. जीवनात कधी-कधी सनई बेसूर झाल्यावर चौघडे आपोआप ठेका चुकतात तरी पण आपल्यासाठी इतरांचे मन बावरे झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करत जा या शब्दांसह जगदीश भंडरवार यांना भावी जीवनासाठी शुभकामना!