कोरोना बातमी;मंगळवारी रुग्ण संख्या घसरली;आजचे नवीन रुग्ण १४४;सुट्टी झालेले रुग्ण २७४

नांदेड,(प्रतिनिधी)- आज मंगळवारी कोरोना विषाणूने एकूण १४४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २२७९ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९.१२ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात १.३१ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ४३.७५ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ३१ जानेवारी रोजी कोरोना बाधेने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज १४४ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-१७२, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०, तालुक्यातील गृह विलगीकरण-८५,किनवट-०१,खाजगी रुग्णालय-०८,अश्या २७४ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९६६८९ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९.१२ टक्के आहे.
             आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-६३, मुखेड-०, नांदेड ग्रामीण-०५,   मुदखेड-०३,  बिलोली-०,  किनवट-१४,  कंधार- ०, नायगाव-०, लोहा-०,देगलूर-०२ धर्माबाद-०, हिमायतनगर-०१,उमरी-०,  हदगाव-०,उमरखेड-०१,माहूर-०२,  भोकर-०१,परभणी-०, हिंगोली-०,वाशीम-०,निझामाबाद-०१,पुणे-०१, वर्धा-०१,अकोला-०१,औरंगाबाद-०४,हैद्राबाद-०२, पंजाब-०१, असे आहेत.
             आज १३९६ अहवालांमध्ये ११०६ निगेटिव्ह आणि १४४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०१६३९झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत १२३ आणि २१ अँटीजेन तपासणीत असे एकूण १४४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १४१ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०१ आहेत.
                                आज कोरोनाचे २२७९ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण –९९८, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-१२१७,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३,जिल्हा रुग्णालय-०१,माहूर-०१,
खाजगी रुग्णालयात- ३, किनवट-०, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *