नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या प्रगतीनगर, तरोडा (बु) भागात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका व्यक्तीचे बर्की चौक ते हबीब टॉकीज दरम्यान सोन्याचे नॅकलेस लंपास केले आहे. गार्गी हॉस्पीटलजवळून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
ब्रम्हनाथ बालाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबुु्रवारीच्या रात्री 9 ते 3 फेबु्रवारीच्या सकाळी 6 वाजेदरम्यान साई रेसीटेंन्सी, प्रगतीनगर, तरोडा (बु) येथील आपले घर बंद करून ते आपल्या मित्राच्या घरी गेले होते. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात असलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि मोबाईल असा 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरिक्षक शेख जावेद यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
ज्ञानेश्र्वर संभाजी निकम हे खरेदी करण्यासाठी 3 फेबु्रवारीच्या दुपारी 4 ते 4.30 दरम्यान हबीब टॉकीज बर्की चौक या रस्त्यावर फिरत असतांना ते एका कपड्याच्या गाड्यावर खरेदी करण्यासाठी थांबले. त्यांची नजर चुकवून कोणी तरी चोरट्याने त्यांच्या पर्समधील 21 ग्रॅम सोन्याचे नॅकलेस किंमत 60 हजार रुपयांचे चोरून नेले आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.
बाबाराव जयवंतराव नाईकवाडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एम.1780 ही 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 2 फेबु्रवारीला दुपारी 1 वाजेच्या सुमारास गार्गी हॉस्पीटलसमोरून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार सुर्यवंशी करीत आहेत.
तरोडा (बु) घरफोडून 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास