नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऍटोमध्ये प्रवास करतांना 25 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरट्यांनी लांबवले आहेत. गांधीनगर देगलूर येथून एक 15 हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरुपती सोसायटी धनेगाव येथे घर असणाऱ्या अनिल लक्ष्मणराव शहाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 फेबु्रवारी रोजी सकाळी 8.30 ते 4 फेबु्रवारीच्या रात्री 10.30 वाजेदरम्यान ते कुलदैवत दर्शनासाठी सेलू येथे गेले होते. परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडलेला होता आणि घरातून 20 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या अंगठ्या चोरून नेल्या होत्या. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार पांचाळ करीत आहेत. हा गुन्हा 5 फेबु्रवारी रोजी दाखल करण्यात आला आहे.
माधव शंकर पापुलवार हे 26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता ते ऍटोने प्रवास करीत असतांना त्यांच्या खिशात ठेवलेले दोन मोबाईल 25 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्या सहप्रवाशांनी काढून घेतले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
दत्तात्रय नरसींग पांचाळ यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.0560 ही 30-31 जानेवारीच्या रात्री गांधीनगर देगलूर येथून चोरीला गेली. या गाडीची किंमत 15 हजार रुपये आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.