अनूसुचित जातीच्या वस्तीवर हल्ला करून रान पेटविण्याचे प्रयत्न

पोलीसांच्या प्रयत्नानी थांबले; 34 नावांसह गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-अनूसुचित जातीच्या वस्तीवर हल्ला करून रान पेटविण्याचा प्रयत्न पोलीसांच्या तत्परतेमुळे थांबला. एका युवकाला जुन्या कुरापातीच्या कारणावरून जमावाने अनुसुचित जातीच्या वस्तीवर हल्ला करून गोंधळ घातला त्यात तोडफोड करण्यात आली. अर्धापूर पोलीसांनी 34 नावांसह इतर 5 ते 10 लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सध्या लहान गावात पुर्णपणे शांतता आहे.
अर्जुन महादु सावंत (64) रा.लहान ता.अर्धापूर जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कांही लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून 15 दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाची कुरापात काढून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच घरातील साहित्याची नासधुस केली. जमावाने हातात लाठ्या-काठ्या आणि दगड यांचा वापर करून हा हल्ला केला होता. खिडक्यांचे नुकसान 4 हजार रुपयांचे, विद्युत मिटरचे नुकसान 2 हजार रुपयांचे आणि कांही इतर लोकांच्या घरांच्या खिडक्यांचे नुकसान 3 हजार रुपये असा एकूण आरोप या तक्रारीत आहे.
या तक्रारीमध्ये गजू सोनाजी इंगळे, गुरूराज पारकर, पप्पु तानाजी आललवाड, सतिश आललवाड, राजू शिवनकर, अमोल लोखंडे, गजू लोखंडे, गणेश रानेवाड, केशव पारकर, बसू बबन धारकर, सचिन मोरे, नितीन मोरे, राजू तानाजी पवार, बालाजी नरवाडे, नरेश आटक, अभिजित इंगळे, संकेत व्यंकटी इंगळे, दत्ता हारकरी, विठ्ठल हारकरी, कृष्णा हारीकरी, ओमकार देवडे, संदीप जाधव, वैभव पूरी, संतोष घोरबांड, मकु हारकरी, शुभम पवार, शंकर ढगे, ज्ञानेश्र्वर बालाजी इंगळे, कैलास इंगळे, राजू पोतन्ना बेलपेडवाड, अजय माधव देवडे, सचिन सुभाष मंत्री, शुभम मोरे, परमेश्र्वर कुऱ्हाडे यांच्यासह माहित नसलेली 5 ते 10 लोकांची मंडळी अशा जमावाने लहानच्या अनुसूचित जातीवस्तीवर हा हल्ला केला आहे.
या तक्रारीनुसार अर्धापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 35/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 149, 294, 427, 323, 506 सोबत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 2015 तील कलम 3(1)(आर)(एस), 3(2)(बी)(व्हीए)नुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे यांनी दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
अनुसूचित जातीच्या वस्तीवर हल्याचा हा प्रकार 7 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, अर्धापुरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे, पोलीस उपनिरिक्षक सय्यद, कपील आगलावे, सचिन सोनवणे, यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीसांनी घेतलेल्या भुमिकेमुळेच लहानमध्ये पेटविण्यात आलेले रान थोडक्यात थांबले. आज दि.8 फेबु्रवारी रोजी सुध्दा लहान गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि शांतता आहे. अनुसूचित जातीच्या वस्तीवर हल्ला करणाऱ्यांपैकी जवळपास अर्धा खंडी आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *