नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या बापाच्याच मालकीच्या पाच गाई असे 2 लाख 50 हजार रुपयांचे पशुधन पुत्राने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. मुदखेड जवळी चिकाळा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 25 हजारांचा ऐवज लांबवला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 50 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4 लाख रुपयांची एक मालवाहु गाडी चोरीला गेली आहे. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका दुकानातील मोबाईल कोणी तरी चोरट्यांनी लंपास केला आहे.
दत्तनगर, मारोती मंदिराजवळ राहणाऱ्या साहेबराव तातेराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत त्यांचा पुत्र अर्जुन याने त्यांच्या पाच गाई, किंमत 2 लाख 50 हजार रुपये असे पशुधन चोरून नेले. साहेबरावने आपल्या गाई परत करत असे अर्जुन देशमुखला सांगितले तेंव्हा त्याने बंदुकीने तुला जीवंत मारतो अशी धमकी दिली. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 44/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 323, 504, 506 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार शेख इब्राहिम यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शालीमार फंक्शन हॉलसमोरून अब्दुल वसीम अब्दुल रजाक यांची माल वाहु गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डी.3294 दि.4 फेबु्रवारीच्या रात्री 10 ते 5 फेबु्रवारीच्या पहाटे 9 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 4 लाख रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.
चिकाळा येथील संजीवनी ज्ञानेश्र्वर कोकणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 फेबु्रवारीच्या रात्री 10 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या छतावरून आत प्रवेश करून कपाटातील 25 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार पवार हे करीत आहेत.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कलामंदिरजवळ दिलीप सिताराम ढगे यांनी 3 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 वाजता उभी केलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.1495 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी फक्त 45 मिनिटात चोरीला गेली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार अनिल झांबरे अधिक तपास करीत आहेत. वजिराबाद भागातूनच माणिक दत्ता भाकरे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.झेड. 4053 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी 4 फेबु्रवारी ते 7 फेबु्रवारी दरम्यान चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा ही गुन्हा दाखल केला आहे.
धोंडू अप्पा बासटवार यांची जय गजानन मेडिकल, गणेशनगर येथे दुकान आहे. 6 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान ते आपल्या दुकानात काम करत असतांना त्यांच्या कॉन्टरवर ठेवलेला त्यांचा 15 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार लांबदाडे हे करीत आहेत.
वडीलाच्या पाच गाई मुलानेच चोरल्या ; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मालवाहू गाडी चोरीला गेली