नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एक पुरुष रुग्णाला मृत्यू दिला आहे. बुधवारी कोरोना विषाणूने एकूण ९६ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ८२४ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९६.५८ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ०७.२७ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ४४.७९ टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी कोरोना बाधेने एक महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज ५४ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
कोरोना मुळे सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे हिमायतनगर येथील पुरुष वय ६५ यांचा मृत्यू कोरोना बाधेने झाला आहे.
नांदेड मनपा विलगिकरणातून-१९०,खाजगी रुग्णालय-०६, तालुक्यातील गृह विलगीकरण-२१५,अश्या ४११ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९९१७७ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६.५८ टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-४३, मुखेड-०५, देगलूर-०१,लोहा-०४,अर्धापूर-०१,मुदखेड-०१, बिलोली-०१,उमरी-०१,
हदगाव-०४,भोकर-०४,किनवट-०६,माहूर-०९,नांदेड ग्रामीण-०४, हिमायतनगर-०३, हिंगोली-०४, परभणी-०१, यवतमाळ-०१, पंजाब-०१, उत्तरप्रदेश-०१, राजस्थान-०१, असे आहेत.
आज १३२० अहवालांमध्ये ११९३ निगेटिव्ह आणि ९६ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०२६८६ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ७८ आणि १८ अँटीजेन तपासणीत असे एकूण ९६ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब २८ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०३ आहेत.
आज कोरोनाचे ८२४ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -४४०, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-३३८,सरकारी रुग्णालय -२१, खाजगी रुग्णालयात- २३,देगलूर-०२, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.