जवळपास 2 टन प्लॉस्टीक कॅरीबॅग साठा जप्त ; तिघांकडून 16 हजार रुपये दंड वसुल

नांदेड(प्रतिनिधी)-प्लॉस्टीकचा विक्री, वापर करण्यावर बंदी असतांना सुध्दा प्लॉस्टीकचा सर्रास वापर सुरूच आहे. या प्रक्रियेत महानगरपालिकेने आज प्लॉस्टीक विक्री करणाऱ्या 3 जणांकडून 16 हजार रुपये रोख दंड वसुल करून जवळपास 1 टन 850 क्विंटल प्लॉस्टीक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत. शहरात प्लॉस्टीक बॅगचा वापर थांबला पाहिजे. नाही तर या पुढे आज पेक्षा जास्त तिव्र कार्यवाही प्लॉस्टीक वापरणारे, साठवणारे आणि वाहतुक करणाऱ्यांविरुध्द केली जाणार आहे.
                      महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार जुना मोंढा भागातील लॉर्ड व्यंकटेश्वरा ट्रेडर्स, हरिश मोडलवार आणि उमेश बलदवा या तिघांकडे तपासणी झाली. यात लॉर्ड व्यंकटेश्र्वराच्या मालकीन सौ.प्रिया दिनेश कोत्तावार या आहेत. यांच्याकडून 1 टन 850 क्विंटल साठवलेल्या प्लॅस्टीक कॅरीबॅग साठा महानगरपालिकेने जप्त केला आहे. यात लॉर्ड व्यंकटेश्वरा ट्रेडर्सकडून 10 हजार, हरिश मोडलवार यांच्याकडून 5 हजार आणि उमेश बलदवा यांच्याकडून 1 हजार  असा 16 हजार रुपये दंड महानगरपालिकेने वसुल केला आहे. या पुढे सुध्दा शहरात कॅरीबॅगची विक्री, साठवण, वाहतूक व इतर वापर करणाऱ्यांविरुध्द कडक कार्यवाही केली जाईल. प्लॅस्टीकचे पाणी पाऊच सुध्दा यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
                    मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशावरुन उपायुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनात मनपा अधिकारी गुलाम मोहम्मद सादेक, डॉ.रईसोद्दीन, रावण सोनसळे, राजेंद्र गंदमवाड, एम.ए.समी, वसीम तडवी, मोहन लांडगे यांनीही कार्यवाही केली  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *