नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने नवीन मोंढा भागात दोन गावठी पिस्टल पकडल्या आहेत. या आरोपीतांमध्ये एक 22 वर्षीय युवती आहे.
दि.7 फेबु्रवारीच्या रात्री 10 वाजता शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांना मिळालेल्या माहितीनुसार नवा मोंढा परिसरात कांही जण पिस्टल/ गावठी कट्टे घेवून फिरत आहेत. तेंव्हा नरुटे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तिकडे पाठवले. पोलीसांनी त्या ठिकाणी तेजस प्रदीप मोदकुलवाड (20) रा.व्यंकटेशनगर, हिंगोली गेट नांदेड आणि संतोष उर्फ चिंग्या साईनाथ तरटे (21) रा.खोब्रागडेनगर या दोघांना पकडले. या प्रकरणात सांगली येथील एक 22 वर्षीय युवती सुध्दा आरोपी असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या लोकांकडे दोन गावठी कट्टे सापडले आहेत. रवि वाहुळे यांच्या तक्रारीवरुन दोघांविरुध्द भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार गुन्हा क्रमांक 45/2022 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार रामकिशन मोरे, शेख लियाकत, संजय मुंडे, रवि बामणे, मधुकर आवातिरक, दिलीप राठोड आदींनी या पिस्तुल वापरणाऱ्या आरोपींना गजाआड केले.
