आधार हॉस्पिटल आणि सेवा बाल रुग्णालय यांना दहा हजार दंड

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील दवाखान्यांमध्ये तयार होणारे बायो मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या दवाखान्यांविरुद्ध महानगर पालिका कार्यवाही करत आहे.प्रसार माध्यमे या घटनांना प्रसिद्ध करीत आहेत. तरीही जैविक कचरा मनपाच्या घंटागाडीत टाकण्याचे श्रेय सोडण्यास दवाखाने तयार नाहीत.आज ११ फेब्रुवारी रोजी सुद्धा मनपाने याच कारणासाठी आधार हॉस्पिटल आणि सेवा बाल रुग्णालय या दोन प्रतिष्ठानांकडून १० हजारांचा दंड वसूल केला आहे.

शहरातील दवाखान्यांमध्ये तयार होणार जैविक कचरा समाप्त करण्यासाठी कायदेशीर नियमावली आहे.तेथे तो जैविक कचरा पोहचता करायचा असतो.मग ती संस्था त्या जैविक कचऱ्याची इतरांना आरोग्याचा धोका होणार नाही यापद्धतीने समाप्त करते.बहुदा त्यासाठी काही फीस आकारली जाते. पण आपले थोडे पैसे वाचवण्यासाठी आणि थोडी मेहनत वाचवण्यासाठी दवाखाने आपल्या प्रतिष्ठानात तयार होणार जैविक कचरा महानगर पालिकेच्या घंटागाडीत टाकून देतात.त्यामुळे नांदेड शहरातील सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यास धोका तयार होतो.दवाखान्यात आरोग्य सुविधा देण्यासाठी भरमसाट बिल आकारले जाते.पण जैविक कचरा घंटागाडीत टाकून आरोग्यास धोका देणाऱ्या दवाखान्यांना खरेतर जागतिक पुरस्कार दिला पाहिजे.

मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने,अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे,उप आयुक्त शुभम क्यातमवार यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कडून असे दवाखाने शोधायची मोहीम सुरु केली आहे.त्यात अनेक दवाखान्यांकडून रोख दंड वसूल करण्यात आला आहे.तसेच हि शोध मोहीम सुरूच राहणार आहे.

आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मनपाचे अधिकारी मोहंमद सादेक रमेश चौरे,राजेंद्र गंदमवार,किशन तारू,सतीश मुकापल्ले,संजय जगतकर,आणि इतरांनी मनपाच्या घंटागाडीत जैविक कचरा टाकणाऱ्या आधार हॉस्पिटल आणि सेवा बाल रुग्णालय यांना शोधलेच आणि त्यांच्या कडून प्रत्येकी ५ हजार रुपये रोख दंड असा एकूण १० हजार रोख दंड वसूल केला आहे.आतातरी दवाखान्यानी आपल्या प्रतिष्ठानात तयार होणार जैविक कचरा घनकचरा व्यवस्थापन नियम – २०१६ आणि बायो मेडिकल वेस्ट हँडलिंग रुल्स १९९८ प्रमाणे नष्ट करावा नसता पुन्हा दंड भरावाच लागेल. असे मनपाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *