नांदेड(प्रतिनिधी)-खानापूर ता.देगलूर गावातील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. कंधार एस.टी.आगारातील दोन कक्षांचे कुलूप तोडून चोरटयांनी 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उस्माननगर पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे अशा दोन ठिकाणावरुन चोरट्यांनी 70 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरून नेल्या आहेत.
संग्राम पुंडलिक मुर्गे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 फेबु्रवारी रोजी त्यांचे खानापूर येथील घर कोणी तरी चोरट्यांनी फोडले. घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडण्यात आला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 37 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.
कंधार एस.टी.आगारातील वाहतूक निरिक्षक जगदीश प्रकाश मंटगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 फेबु्रवारी रोजी कंधार एस.टी.आगारातील दोन कक्ष कोणी तरी चोरट्यांनी फोडले आणि त्यातील प्रिंटर, लाऊडस्पिकर, स्टिलचे साहित्य, संगणक असा एकूण 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणाचार्य हे करीत आहेत.
सारंग भिमराव खानसोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 फेबु्रवारीच्या सकाळी 10.30 ते 9 फेबु्रवारीच्या रात्री 3.30 वाजेच्यादरम्यान मौजे वाका ता.लोहा येथे त्यांनी उभी केलेली त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.वाय.5526 ही 50 हजार रुपयांची गाडी चोरीला गेली आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार श्रीमंगले अधिक तपास करीत आहेत.
गणेशनगर भागातून महेंद्र गणेशराव कुंडगुलवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.पी.6105ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी 10 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजता चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिरी अधिक तपास करीत आहेत.
खानापूर येथे घरफोडून 1 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरी