नांदेड(प्रतिनिधी)-आपल्यातील अंतरगुणांना चालना द्यावी यासाठी प्रयत्न सुरू असतो. पण पोलीस मात्र उगीचच चांगल्या अंतरगुणांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार एक दुचाकी पाहिल्यावर लक्षात आले. या दुचाकीवर अनंत हे नाव एवढ्या सुंदरतेने लिहिले आहे की, त्याची प्रशंसा करायला हवी.
काल दि.12 फेबु्रवारी रोजी रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीने आम्हाला एक फोटो पाठवला. या फोटोमध्ये एक महागडी दुचाकी गाडी दिसते आहे. त्या दुचाकीच्या नंबर प्लेटकडे पाहिले तर त्यावर अनंत हे नाव दिसते. याबाबत शोध घेतला तेंव्हा तो क्रमांक 3177 आहे. या गाडीचा संपुर्ण क्रमंाक एम.एच.26 ए.के.3177 आहे. पण या 3177 ला एवढ्या सुंदरपणे आलेखीत करण्यात आले आहे की, ते नाव अनंत दिसते. अत्यंत सुंदर अशा कल्पनेतून अनंत हे नाव कोरतांना 3177 चा एवढा छान उपयोग करण्यात आला आहे की, त्याला तोडच नाही.
परिवहन विभागाच्या वतीने आता त्यांनी तयार केलेले नंबर प्लेट आपल्या गाड्यांवर लावणे कायद्यानुसार बंधनकारक आहे पण आपल्यातील आत लपलेल्या या गुणांना कोणी बाहेर काढले तर आपल्याला त्याचा राग असावा हे चुकीचे आहे. राज्य स्तरावर सुध्दा वाहनांवर फॅन्सीप्रकारे नंबर लिहिले तर त्याचा शोध होणार आहे म्हणे.पण या दुचाकीवर लिहिलेल्या अनंत या शब्दाला तयार करण्यात लागलेली मेहनत नक्कीच लक्षात घेतली पाहिजे अशा नंबर प्लेटस्वर पोलीस विभाग कार्यवाही करतात पण त्या व्यक्तीने दाखवलेल्या कलागुणांची कधी पोलीसांनी सुध्दा प्रशंसा केली पाहिजे.
