नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या वास्तव्यासाठी दिलेल्या दोन एकर जागेत भुखंड तयार करून त्याचे श्रीखंड खाणाऱ्या पत्रकारांविरुध्द महानगरपालिका आयुक्त यांच्यावतीने वर्तमानपत्रामध्ये जाहिर प्रगटन देण्यात आले आहे. ही कार्यवाही पुर्ण झाली तर नांदेड शहराच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीच्या संपत्ती महानगरपालिका सुरक्षीत ठेवते असे दिसेल. आज दिलेल्या जाहिर प्रगटनाबद्दल महानगरपालिका आयुक्तांचे अभिनंदनच केले पाहिजे. पण ज्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी ही दोन एकर जमीन बेघर पत्रकारांना दिली. त्यांचीही चौकशी व्हायला हवी.
99 वर्षाच्या भाडे करारावर नांदेड येथील कांही बेघर पत्रकारांना आपल्या राहण्यासाठी निवारा मिळावा म्हणून 1982 पासून पत्रकारांना जागा देण्याचा निर्णय झाला. प्रत्येक्षात जागेचा ताबा 14 नोव्हेंबर 1990 रोजी देण्यात आला. याबाबतचा भाडेकरार दुय्यम निबंधक कार्यालयात 27 जानेवारी 2009 रोजी तयार झाला. त्यानंतर या जागेवर पत्रकार सहवास को.ऑप हाऊसिंग सोसायटीच्या मुळ सदस्यांमध्ये अनेक बदल झाले. ते बदल कसे घडले याची माहिती महानगरपालिकेने बेघर पत्रकारांच्या सोसायटीची माहिती घेतली पाहिजे. त्या सदस्यांमधील झालेला बदल कसा घडला. बदल झालेले पत्रकारच आहेत काय? याचा शोध पण व्हावा. नांदेड शहरातील सर्वसामान्य माणसाच्या मालकीची सर्व्हे नंबर 1 व 2 मौजे असदुल्लाबाग येथील 2 एकर जमीन ज्या पत्रकारांनी आपल्या ताब्यात घेतली, त्याचे भुखंड तयार केले आणि त्या भुखंडातून श्रीखंड खाण्याचा प्रकार सुरू केला. त्यांच्या वडीलोपार्जित संपत्तीची सुध्दा चौकशी झाली पाहिजे. कारण बेघर आहोत म्हणून नांदेडमधील नागरीकांच्या मालकीची जागा घशात टाकतांना इतरांना आपल्या शब्दातून आपण धडे देतो याचा विसर या पत्रकारांना पडला.
11 फेबु्रवारी रोजी महानगरपालिका आयुक्तांनी एक लेखी नोटीस महानगरपालिका अधिनियमानुसार बेघर पत्रकारांच्या सोसायटी अध्यक्षाच्या नावे जारी केली. कालच वास्तव न्युज लाईव्हने याबद्दल लिखाण केले होते. त्यात अध्यक्षाचे नाव नाही, अध्यक्ष भेटलाच तर तो नोटीस घेईल की, नाही अशा शंका उपस्थित केल्या होत्या. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेले एक जाहिर प्रगटन आज 13 फेबु्रवारी रोजी वर्तमानपत्रात छापून आले आहे. महानगरपालिकेने केलेल्या या कार्यवाहीचे कौतुकच करायला हवे. कारण लोकशाहीमध्ये भारताचा सर्वसामान्य नागरीक हा केंद्र बिंदु मानुन काम व्हायला हवे पण त्याला छेद देत कांही पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या कांही चांगल्या, वाईट बातम्या लिहुन या बेघर पत्रकारांनी महानगरपालिकेची ही दोन एक जमीन लाटलेली आहे. खरे बेघरांना जमीन देण्याच्या प्रत्येक कागदाची प्रत्येक स्वाक्षरीची चौकशी व्हायला हवी. ज्यामुळे कोणी, कोणत्यावेळेस, कसे या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यातून अजूनही लपलेले बरेच सत्य समोर येईल.
महानगरपालिकेने दिलेल्या जाहिर प्रगटनानुसार जनता, संबंधीत व्यक्ती जे बेघर पत्रकार सोसायटी सोबत जोडले गेले आहेत. त्यांना महानगरपालिकेने या जाहिर प्रगटनातून सुचित केले आहे की, महानगरपालिकेने दिलेली दोन एकर जागा आणि अधिनियमातील कलम 81 (ब)(1) नुसार अशा पध्दतीने भाडे तत्वावर दिलेली जागा महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय हस्तांतरीत करता येत नाही. म्हणून महानगरपालिकेच्या जागेतून अशा लोकांना काढून टाकण्याचा आदेश देता येतो. जनतेतील कोणत्याही व्यक्तीने या बेघर पत्रकारांच्या भुखंडातील श्रीखंडात सहभाग घेवू नये नाही तर कोणत्याही क्षणी तयार असणाऱ्या इमारतींसह महानगरपालिका ही जागा आपल्या ताब्यात घेवू शकते. हे जाहिर प्रगटन म्हणजे बेघर पत्रकारांच्या सोसायटीचा अध्यक्ष सापडणार नाही, तो नोटीस घेणार नाही आणि दहा दिवसांत त्याचे उत्तर देणार नाही. पण बेघर पत्रकारांच्या सोसायटीत सुरू असलेले हस्तांतरणाचे काम सुरू राहिल. म्हणून सार्वजनिक रित्या मनपा आयुक्तांनी हे जाहिर प्रगटन दिले आहे. खरे तर मनपाने दुय्यम निबंध कार्यालयात सुध्दा या जमीनीसंदर्भाने कोणतेही हस्तांतरण करण्यात येवू नये अशी सोय करायला हवी. एकंदरीत बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये सुरू असलेल्या भुखंडाच्या श्रीखंडात आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रकार मनपा आयुक्तांनी केला आहे. तो प्रशंसनिय आहे.
बेघर पत्रकार आता राजकीय उंबरठ्यांवर…
बेघर पत्रकारांनी आपल्या सोसायटीतील भुखंडांचे श्रीखंड गेल्यानंतर शब्दांच्या माध्यमातून टिकेची झोड उठली. तेंव्हा बेघर पत्रकार सोसायटीतील एका म्होरक्याने कांही सेवकांच्या सोबत नांदेडमधील राजकीय लोकांचे उंबरठे झिजवले. उंबरठे झिजवतांना त्याच्या लक्षात आले हे काम आता राजकीय मंडळी करणार नाहीत. तेंव्हा त्यांनी रंगबदलून नवीन राजकीय उंबरठे झिजविण्यासाठीची सुपारी एका गायकाला दिल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. गायकाच्या प्रयत्नाने बेघर पत्रकारांच्याविरुध्द वास्तव न्युज लाईव्ह, कॉंगे्रस नगरसेवक मुन्तजिबोद्दीन यांनी हातात घेतलेला बंडाचा झेंडा खाली पाडण्यासाठी प्रयत्न यशस्वी होतील की, नाही यात आज तर शंकाच आहे.
बेघर पत्रकारांच्या सोसायटीतील भुखंडात जनतेने सहभागी होवू नये; महानगरपालिकेने वर्तमानपत्रात दिले जाहिर प्रगटन