पालम येथून पळवून आणलेला अल्पवयीन बालक वजिराबाद पोलीसांनी ताब्यात घेतला

नांदेड(प्रतिनिधी)-पालम जिल्हा परभणी येथून गायब झालेला एक अल्पवयीन बालक नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आणि पोलीस अंमलदार संतोष आरलुवाड यांनी सायंकाळी 6 वाजेच्या आसपास ताब्यात घेतला आहे.
नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे यांचा एक सहकारी पोलीस उपनिरिक्षक, वर्गमित्र पालम येथे कार्यरत आहे. त्यांचे नाव संदीप भोसले आहे. भोसले यांनी प्रविण आगलावे यांना कॉल केला आणि एका अल्पवयीन बालकाचा फोटो पाठवून त्याला रेल्वे स्थानकावर जावून ताब्यात घेण्यास सांगितले. पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आणि पोलीस अंमलदार संतोष आरलुवाड हे त्वरीत रेल्वे स्थानकावर पोहचल आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या फोटोच्या आधारे त्या बालकास शोधायला सुरूवात केली. एक 13 वर्षाचा बालक त्यांनी इकडे तिकडे पळतांना पाहिला आणि आपल्याकडे असलेल्या फोटो सोबत त्याची तुलना केली तेंव्हा हा बालक तोच असल्याचा विश्र्वास झाला. त्यांनी त्या बालकाला ताब्यात घेतले. दरम्यान तासाभरात त्याचे वडील सुध्दा नांदेडला पोहचले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार अल्पवयीन बालकाच्या सांगण्याप्रमाणे एका लालरंगाच्या कारमध्ये त्याला पालम येथून बसवून तोंडावर दस्ती टाकून नांदेडला आणले आणि रेल्वे स्थानकावर सोडून कार आणि कारमधील माणसे निघून गेली आहेत. या कारवर एक झेंडा असल्याचेही तो बालक सांगतो. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी एका अल्पवयीन बालकाला त्वरीत प्रभावाने ताब्यात घेणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आणि पोलीस अंमलदार संतोष आरलुवाड यांचे कौतुक केले आहे. या प्रकरणातील घटनाक्रम पुर्णरितीने अद्याप माहित नाही पण वजिराबाद पोलीसांनी अत्यंत त्वरीतगतीने मिळालेल्या माहितीच्या आधारावर या अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतल्याने बऱ्याच प्रश्नांवर पर्दा पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *