नांदेड(प्रतिनिधी)- आज 15 फेब्रुवारी रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.
आज 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची जयंती. शासनाने नुकत्याच जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार संत सेवालाल महाराज जयंती साजरी करायची आहे. त्यानुसार पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय अर्चन पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरिक्षक ए.एस.काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीमती शिंदे, प्रशिक्षण विभागाच्या पोलीस उपनिरिक्षक पिंपरखेडे तसेच इतर शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी यांनी संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करून जयंती साजरी केली. जनसंपर्क विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, संजय सांगवीकर आणि विनोद भंडारे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.