नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव मेघश्याम साळुंके, मारोती चव्हाण, नारायण गोरे, रामदास खोकले, संदिप एडके, रवि पवार, रविंद्र मैड, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.