नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भाने जारी झालेल्या परिपत्रकाचा गैर फायदा घेवून ज्या लोकांनी पोलीस सुरक्षा (गनर) मिळवला होता. ते गनर काढून समाजासाठी एक भले काम केले. कुख्यात गॅंगस्टर हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंदा याने धमक्या दिल्यामुळे ज्या लोकांना पोलीस सुरक्षा (गनर) मिळाले आहेत. त्याबाबत नांदेड जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा संपरिक्षा करुन त्यांचेही गनर काढले पाहिजेत. कारण रिंदा हा व्यक्ती सध्या पाकिस्तानमध्ये आहे. हे त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले. मग त्याच्या नावावर लोकांना देण्यात आलेले गनर कमी करण्याची गरज आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाने माहिती अधिकार कायदा (आरटीआय) या नावावर अनेक जणांनी आपल्या सुरक्षेसाठी गनर घेतले होते. शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ दाखवून हे गनर मिळाले होते. कांही जणांना पिस्तुले देण्यात आली. त्याचा तर ईतिहास कांही तासांचा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने सुरक्षा हवी असेल तर त्याला लागणारा कालावधी मोजला तर सुरक्षा मागणाऱ्या व्यक्तीचे कंबरे मोडले तर सुरक्षा दिली जात नाही. ज्या लोकांना सुरक्षा दिली गेली होती. त्या लोकांनी पोलीस दलातील सुर्याजी पिसाळ, मिर जाफर, मिर सादीक अशा वृत्तीच्या पोलीसांना पकडून चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांविरुध्द अर्ज बाजारी करून ही पोलीस सुरक्षा(गनर) आणि आपल्यासाठी पिस्तुले मिळवली होती. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या बाबतची सर्व माहिती घेवून समाजाला होणारा त्रास समजून घेवून या सर्व आरटीआय कार्यकर्त्यांची पोलीस सुरक्षा(गनर) काढून घेतले होते.
त्यानंतर एकाने सुरक्षा काढल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयात धाव घेवून मी विस्टल ब्लोअर असल्याचे सांगून मी मरेल यासाठी मला सुरक्षा हवी असा अर्ज केलेला आहे. त्यात त्याने पोलीस महासंचालकांना सुध्दा प्रतिवादी केले आहे. नांदेड जिल्हा पोलीस दल हे कायद्याच्या दृष्टीकोणातून पुर्णपणे समर्थ आहे. उच्च न्यायालयातील त्या याचिकाला ते उत्तर देणारच पण या संदर्भाने पोलीस दलातील सुर्याजी पिसाळ, मिर सादीक आणि मिर जाफर वृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त सुध्दा झाला पाहिजे. तरच उच्च न्यायालयात सादरीकरण योग्यरितीने होईल. नसता गडीवरून शेळ्या हाकलतांना मीच मोठा आहे असा समज ज्यांचा आहे त्यांना जिंकण्याची संधी प्राप्त होईल.
एका विषयाला नांदेड जिल्हा पोलीस दलाने चांगलेच पुढे नेले आहे. पोलीस सुरक्षेमधील आणखी एक विषय असा आहे की, नांदेड शहरात अनेक गुन्ह्यांमध्ये नाव असलेला व्यक्ती हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंदा याने धमक्या दिल्यानंतर नांदेडमधील बऱ्याच लोकांना पोलीस सुरक्षा( गनर) देण्यात आला आहे. या लोकांचा अभ्यास केला तर हे सर्व व्यक्ती गडगंज श्रीमंत आहेत. म्हणजे रिंदाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असेल तर ते आपले पैसे खर्च करून सुरक्षा उपलब्ध करू शकतात. पण त्यांना सुध्दा पोलीस सुरक्षाच हवी आहे. कारण पोलीस हा गणवेशात असतो आणि गणवेशात त्याच्या कंबरेला लावलेली बंदुक ही गनर मिळालेल्या व्यक्तीसाठी इतरांच्या मनात आदर, भिती, निर्माण करते आणि त्यासाठीच तो पोलीस सुरक्षा रक्षक हवा असतो.
रिंदाने मागे काही महिन्यापुर्वी दिलेल्या एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीनुसार तो सध्या पाकिस्तानमध्ये आहे. भारतातील सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआय, रॉ, आदी सुध्दा त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे आजच्या परिस्थितीत नांदेडमध्ये रिंदाच्या नावाला जोडून ज्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. ती सुरक्षा म्हणजे शासनाच्या पैशांचा निर्थक खर्च आहे. सोबतच जिल्हा पोलीस दलाला आवश्यक असलेले मनुष्य बळ कमी करणारी परिस्थिती आहे. तेंव्हा नांदेड जिल्हा पोलीस दलाने रिंदाच्या नावावर ज्यांना पोलीस सुरक्षा(गनर) देण्यात आला आहे. त्या सर्वांची संपरिक्षा करून घेण्याची गरज आहे.